संवाद : वास्तुकला शाखेतील पदवी प्रवेश परीक्षा

आपण मागील लेखात वास्तुकलेचा पदवी अभ्यासक्रम माहिती घेतली. या भागात प्रवेश परीक्षेबाबत जाणून घेणार आहोत.
Degree Entrance Examination
Degree Entrance Examinationsakal
Summary

आपण मागील लेखात वास्तुकलेचा पदवी अभ्यासक्रम माहिती घेतली. या भागात प्रवेश परीक्षेबाबत जाणून घेणार आहोत.

- ऋषिकेश हुली

आपण मागील लेखात वास्तुकलेचा पदवी अभ्यासक्रम माहिती घेतली. या भागात प्रवेश परीक्षेबाबत जाणून घेणार आहोत. भारतात वास्तुकला शाखेतील पदवी प्रवेश मुख्यत- दोन प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून राबवण्यात येतो.

१. वास्तुकला परिषदेमार्फत घेतली जाणारी ‘नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA). Website: https://www.nata.in

२. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत घेतली जाणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE) Website: https://jeemain.nta.nic.in/

प्रवेशाच्या पात्रतेचे निकष

  • १०+२ परीक्षा पद्धतीमध्ये एकूण ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण आणि त्याचबरोबर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या तीन विषयांमध्ये एकूण ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी परीक्षा उत्तीर्ण.

  • किंवा १०+३ पूर्णवेळ डिप्लोमा अभ्यासक्रमात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण आणि गणित विषय अनिवार्य किंवा योग्य त्या प्राधिकरणाने वेळोवेळी घोषित केल्यानुसार.

  • वास्तुकला परिषदेद्वारे घेण्यात येणाऱ्या किंवा राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत घेतली जाणारी परीक्षा अपेक्षित गुणांनी उत्तीर्ण किंवा योग्य प्राधिकरणाने वेळोवेळी घोषित केल्यानुसार परीक्षा आणि पात्रतेचे निकष. वरील नमूद केलेल्या दोन्ही प्रवेश परीक्षांबाबत, त्यांच्या तारखा, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत (ऑनलाइन/ऑफलाइन), परीक्षा सेंटर, परीक्षा शुल्क, इत्यादी गोष्टींची माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे. यातील तुलनेने महत्त्वाच्या अशा वास्तुकला परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेबाबत महत्त्वाचे असे काही मुद्दे

  • वास्तुकला परिषदेच्यामते इतर कोणतेही प्रवेश परीक्षांच्या विपरीत ‘नाटा’ (NATA) ही एक अभियोग्यता चाचणी आहे. ती उमेदवाराच्या मूलभूत क्षमतेचे विविध चाचणी स्वरूपांद्वारे मूल्यांकन करते आणि त्याचा अभ्यासक्रम हा शिकवला/शिकला किंवा शिकून आत्मसात केला जाऊ शकत नाही. परीक्षा वास्तुकला शाखेच्या दृष्टीने अर्जदाराच्या योग्यतेचे मापन-सज्ञानात्मक कौशल्यांचे मूल्यांकन, व्हिज्युअल आकलन, सौंदर्य विषयक संवेदनशील चाचण्या, तार्किक तर्क आणि गंभीर विचार करण्याची क्षमता, इत्यादी सारख्या उमेदवाराने भूतकाळात प्राप्त केलेल्या गुण-कौशल्यांवर करते.‌

  • योग्यता चाचणीमध्ये मल्टिपल चॉईस, मल्टिपल सिलेक्ट, प्रिव्हेंनशिअल चॉईस आणि मॅच द फॉलोविंग टाइप सारख्या प्रकारच्या पद्धतीचे प्रश्न असू शकतात.

  • १८० मिनिटांच्या इंग्लिश माध्यमातील या परीक्षेत १,२ आणि ३ गुण असणाऱ्या एकूण १२५ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात.‌ काही प्रश्न प्रादेशिक भाषेमध्ये असू शकतात.

  • खाली नमूद केलेल्या काही किंवा सर्व तंत्रांचा वापर करून उमेदवाराच्या योग्यतेचे मूल्यमापन या चाचणीत करण्यात येते.

  • डायग्रामॅटिक रिझनिंग - आकृती आणि परिस्थितीचा वापर करून तार्किक तर्कशक्तीची चाचणी

  • संख्यात्मक तर्क - साध्या सोप्या समस्यांद्वारे गणितीय क्षमतेची चाचणी

  • मौखिक तर्क - शाब्दिक तर्काचे मूल्यांकन करण्याची क्षमता

  • प्रेरक तर्क - नमुने पाहण्याची आणि दिलेल्या डेटाची विश्लेषण करण्याची क्षमता

  • परिस्थितीविषयक निर्णय क्षमता - परिस्थिती बघून समस्या सोडविण्याची क्षमता

  • तार्किक तर्क - नमुने, आकार, प्रतिमा यांमधील सिक्वेन्स आणि संबंध ओळखण्याची क्षमता

  • अ‍ॅबस्ट्रॅक्ट रिझनिंग - सामान्य ज्ञान आणि अभ्यासाचा दिलेल्या परिस्थितीत वापर करण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन

  • बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (B.Arch) २०२३-२०२४ शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी ‘नाटा’-२०२३ प्रवेश परीक्षा यावेळी (२८/०५/२०२३ आणि ०९/०७/२०२३) रोजी आहे.

प्रत्येक दिवशी दोन सेशन्समध्ये घेण्यात येईल. विद्यार्थी प्रवेश परीक्षेची तारीख, सेशन आणि परीक्षा केंद्र आपल्या सोयीनुसार निवडू शकतात. विद्यार्थी अर्जदार जास्तीत जास्त ३ अटेंम्प्ट देऊ शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षांच्या ऑफिशियल वेबसाइटवर बारकाईने पूर्ण माहिती वाचणे आणि अभ्यासणे मदतीचे ठरेल.

पुढील लेखात वास्तुकला शाखेतील पदव्युत्तर शिक्षणाच्या शाखा-उपशाखा आणि संधी यांबद्दल जाणून घेणार आहोत.

(लेखक आर्किटेक्चर, इंटिरिअर आणि लॅंडस्केप डिझाईन क्षेत्रात कार्यरत असून आर्किटेक्चर महाविद्यालयात अध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com