esakal | हेल्थकेअरमध्ये करिअरची संधी; टेक महिंद्रा फाउंडेशनचे सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा
sakal

बोलून बातमी शोधा

हेल्थकेअरमध्ये करिअरची संधी; टेक महिंद्रा फाउंडेशनचे सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा

महिंद्रा ग्रुपच्या टेक महिंद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून स्मार्ट अकॅडमी फॉर हेल्थकेअरमध्ये हे सर्व कोर्स उपलब्ध आहेत.

हेल्थकेअरमध्ये करिअरची संधी; टेक महिंद्रा फाउंडेशनचे सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - हेल्थकेअर प्रोफेशनल्ससाठी टेक महिंद्रा फाउंडेशनने विविध कोर्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले आहेत. यामध्ये सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स ते 2 वर्षांचा डिप्लोमा कोर्सही विद्यार्थ्यांना करता येतो. महिंद्रा ग्रुपच्या टेक महिंद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून स्मार्ट अकॅडमी फॉर हेल्थकेअरमध्ये हे सर्व कोर्स उपलब्ध आहेत. अशाच प्रकारच्या प्रकल्पांसाठी टेक महिंद्रा फाउंडेशन काम करते. 2007 मध्ये टेक महिंद्रा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. शिक्षण, रोजगाराच्या क्षेत्रात कंपनी काम करते. तसंच दिव्यांगांना सक्षम करण्याचं आणि त्यांना पायावर उभा करण्यासाठी कंपनी सातत्यानं प्रयत्न करत आहे. देशात 90 हून अधिक पार्टनर्ससोबत मिळून 11 ठिकाणी 150 पेक्षा जास्त सामाजिक प्रकल्पांवर काम सुरु आहे.

टेक महिंद्राचं भारतातलं मुख्य कार्यालय हे दिल्लीत आहे. याशिवाय 11 प्रादेशिक कार्यालये आहेत. यामाध्यमातून जवळपास 5 लाखांहून जास्त लाभार्थी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. शिक्षण आणि रोजगार या दोन क्षेत्रात 150 प्रकल्प सुरु आहेत. तसंच यामध्ये महिलांना समान संधी देण्यात येत असून दिव्यांगांसाठी 10 टक्के जागाही दिल्या जातात.

हेही वाचा: ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये करियरच्या अनेक संधी’

हेल्थकेअर प्रोफेशनल्स मध्ये करिअर करणाऱ्यांसाठी टेक महिंद्रा फाउंडेशनने स्मार्ट अकॅडमीच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विविध डिप्लोमा कोर्स असून त्यांचा कालावधी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत आहे.

सर्टिफिकेट कोर्स

हॉस्पिटल फ्रंट ऑफिस अँड बिलिंग एक्झिक्युटीव्ह, जनरल ड्युटी असिस्टंट, होम हेल्थ एड यासाठी सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स आहे. तसंच नर्सिंग केअर, ऑप्थॅलमिक टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन हे सर्टिफिकेट कोर्सेस एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करता येतात.

डिप्लोमा कोर्स

डिप्लोमा कोर्समध्ये डायलिसिस टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्नॉलॉजी आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉडी या कोर्सेसचा समावेश आहे. डिप्लोमा कोर्सचा कालावधी हा दोन वर्षांचा आहे.

हेही वाचा: स्कूल ऑफ डिफेन्समध्ये करिअरची संधी, पुण्यात DRDO मार्फत सुरुवात

संस्थेची वैशिष्ठ्ये

टेक महिंद्रा स्मार्ट अकॅडमी फॉर हेल्थकेअरच्या माध्यमातून पॅरामेडिकल डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते. शैक्षणिक अभ्यासक्रमाशिवाय इतर कौशल्यांचा विकास व्हावा यादृष्टीनेही संस्था काम करते. विद्यार्थ्यांना सुसज्ज आणि अद्ययावत अशा लॅब उपलब्ध आहेत. कंपनीच्या सल्लागार आणि व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ आणि अनुभवींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सुविधासुद्धा आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे अशांना आर्थिक मदतही पुरवली जाते. नामवंत आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप आणि नोकरीची संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते.

संस्थेत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवल्या जातात. तसंच प्लेसमेंट असिस्टन्सची सुविधा दिली जाते. सर्व अकॅडमीमध्ये प्लेसमेंट रेट हा 75 टक्क्यांहून जास्त असून भारतातील जवळपास 70 रुग्णालये प्लेसमेंटच्या प्रक्रियेत सहभागी असतात.

बारावीनंतर करिअर ओरिएंटेड शॉर्ट टर्म कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी सकाळ माध्यम समुहाने निर्माण केली आहे. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 च्या माध्यमातून असंख्य असे करिअर ओरिएंटेड कोर्स उपलब्ध करून देण्यात येतील. रजिस्ट्रेशन करण्यासाठी www.sakalexpo.com वर क्लिक करा.

loading image
go to top