Sakal Vidya Education Expo 2022 : करिअर निवडण्याची आजपासून संधी

दहावी-बारावीनंतर उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी कोणत्या? करिअरच्या दृष्टीने कोणकोणते अभ्यासक्रम आहेत?, याची सविस्तर माहिती आणि विद्यार्थी व पालकांच्या मनातील शंकांचे निरसन
Sakal Vidya Education Expo 2022
Sakal Vidya Education Expo 2022Sakal
Summary

दहावी-बारावीनंतर उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी कोणत्या? करिअरच्या दृष्टीने कोणकोणते अभ्यासक्रम आहेत?, याची सविस्तर माहिती आणि विद्यार्थी व पालकांच्या मनातील शंकांचे निरसन

पिंपरी - दहावी-बारावीनंतर उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी कोणत्या? करिअरच्या दृष्टीने कोणकोणते अभ्यासक्रम आहेत?, याची सविस्तर माहिती आणि विद्यार्थी व पालकांच्या मनातील शंकांचे निरसन शनिवारपासून (ता. १८) होणार आहे. कारण, ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवार व रविवारी (ता. १९) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’ आयोजित केले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील नामांकित शिक्षण संस्था एज्यु-एक्स्पोमध्ये सहभागी होणार आहेत. त्यात ‘करियरच्या संधी’ विविध विषयांवर मार्गदर्शन व शैक्षणिक पर्यायांची माहिती मिळेल. कनिष्ठ महाविद्यालयापासून कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘केजी टू पीजी’ अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करियरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळेल. वेगवेगळ्या विद्याशाखा, अनेक महाविद्यालयांचा प्रदर्शनात समावेश आहे. एज्यु-एक्स्पोचे मुख्य प्रायोजक भारती विद्यापीठ आहे.

एमआयटी आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज आळंदी आणि सिम्बायोसिस स्किल्स ॲंड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे सहप्रायोजक आहेत. इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सहयोगी प्रायोजक आहेत.

काय? कुठे? कधी? केव्हा?

कोणासाठी? - विद्यार्थी व पालक

काय? - सकाळ विद्या एज्यु-एक्स्पो २०२२

कुठे? - ऑटो क्लस्‍टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

कधी? - शनिवार, १८ व रविवार, १९ जून २०२२

केव्हा? - सकाळी ११ ते रात्री ८

प्रवेश - विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

मास्क - आवश्‍यक

काय असेल प्रदर्शनात?...

महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे उपलब्ध असणाऱ्या पर्यायाची माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, इंटेरियर डिझाइन, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातून घेता येणार आहे. त्याचबरोबर नाटा, जेईई, नीट, सीईटी यांसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही येथे मार्गदर्शन मिळणार आहे.

काळाच्या बदलत्या जागतिकीकरणामुळे कोणत्याही क्षेत्रात कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. त्या अनुषंगाने अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. नावीन्याची कास धरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, हेच आमच्या संस्थेचे उद्दिष्ट आहे. आमचे विद्यार्थी नवीन उद्योग आणतील.

- डॉ. मंगेश कराड, एमआयटी एडीटी

सर्व विद्यार्थी, पालकांना एकाच छताखाली विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शन, चर्चासत्र, वेगवेगळ्या विद्याशाखा यांची माहिती प्रदर्शनातून मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअरची दिशा ठरवण्यासाठी नक्कीच फायदा होईल. आधुनिक शिक्षण पद्धतीतील अभ्यासक्रमांची माहिती मिळेल.

- डॉ. स्वाती मुजुमदार, सिम्बायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी

नवीन शैक्षणिक धोरण, बदलते अभ्यासक्रम, इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर, आयओटी, आर्टिफिसियल इंटलिजन्स, आयटी या शाखा, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट व व्यवस्थापन, स्थापत्य या क्षेत्रांत होणारे बदल आणि संधी या समजून घेणे अनिवार्य आहे. ‘सकाळ’ने ही उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे.

- डॉ. सायली गणकर, व्हाइस चॅंसलर, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी

आमच्या संस्थेत केजी टू पीजी अभ्यासक्रम शिकवले जातात. विविध कोर्सेसचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन रोजगाराभिमुख कौशल्य देण्यावर भर असतो. प्लेसमेंट व उत्पन्नाचा स्रोत मिळवून देण्यासाठी संस्थेचे कार्यालय आहे. ‘एक्स्पो’द्वारे संस्थेत शिकवल्या जाणाऱ्या विषयांची माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.

- अभय कोटकर, अध्यक्ष, शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्था

सध्या परीक्षा आणि निकालांचे दिवस आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विविध कोर्सची माहिती एक्स्पोतून मिळेल. आमचे वेगवेगळे पदविका व अल्पकालीन अभ्यासक्रम आहेत. नवीन विद्या शाखा अनेक आहेत. तुलनने शैक्षणिक शुल्क कमी आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे.

- डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स

हेल्पलाइन -

सेमिनारसाठी : रोशन : ९५४५९८११५९

अधिक माहितीसाठी : अमित : ९८८१९०७२५२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com