पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; बँकेत होणार अधिकारी पदांसाठी भरती

Bank Recruitment 2021
Bank Recruitment 2021esakal
Summary

बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली बातमी आहे.

Bank Recruitment 2021 : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली बातमी आहे. जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी करायची असेल, तर तुमच्यासाठी अर्ज करण्याची ही उत्तम संधी आहे. सारस्वत सहकारी बँकेनं (Saraswat Cooperative Bank) कनिष्ठ अधिकारी पदांच्या भरतीसाठी नुकतीच अधिसूचना जारी केलीय. इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 डिसेंबर 2021 पासून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करू शकतात.

या भरतीअंतर्गत मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शाखांमधील कनिष्ठ अधिकाऱ्यांची एकूण 300 रिक्त पदं भरली जाणार आहेत. सारस्वत बँकेच्या मुंबई (MMRDA) आणि पुण्यातील शाखांमध्ये कनिष्ठ अधिकाऱ्यांची भरती केली जाणार असून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

Bank Recruitment 2021
संधी करिअरच्या... : दहावीनंतर एनडीए तयारीसाठी एसपीआय संस्था

कोण अर्ज करू शकतो?

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील पदवीधर उमेदवार बँकेतील कनिष्ठ अधिकारी (JR Officer) पदासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त उमेदवाराला NBFC, DSA किंवा क्रेडिट सोसायटीमध्ये किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा : 1 डिसेंबर 2021 रोजी उमेदवारांचं वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावं.

निवड प्रक्रिया : बँक पात्र अर्जदारांना मुलाखत फेरीसाठी बोलावेल. त्यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना कनिष्ठ अधिकारी पदासाठी निवडलं जाईल. मुलाखतीची तारीख लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे.

Bank Recruitment 2021
CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती; पगारही मिळणार चांगला

अर्ज कसा करायचा?

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी saraswatbank.com बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देणं आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज 22 डिसेंबर 2021 पासून सुरू होतील आणि 31 डिसेंबर 2021 पर्यंत चालतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com