संधी करिअरच्या... : आवडीचे क्षेत्र निवडताना...

पूर्वीच्या काळी परंपरागत व्यवसायावर भर दिला जायचा. मुलगा बहुतकरून वडिलांचा व्यवसाय सांभाळत पुढे न्यायचा. व्यवसायाच्या नव्या वाटा खूप कमी लोक चोखाळायचे.
career opportunity
career opportunitysakal
Summary

पूर्वीच्या काळी परंपरागत व्यवसायावर भर दिला जायचा. मुलगा बहुतकरून वडिलांचा व्यवसाय सांभाळत पुढे न्यायचा. व्यवसायाच्या नव्या वाटा खूप कमी लोक चोखाळायचे.

- सविता भोळे

उच्च शिक्षणामध्ये भारतातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था कॉलेजेस यांची माहिती या सदरातून घेणार आहोत.

पूर्वीच्या काळी परंपरागत व्यवसायावर भर दिला जायचा. मुलगा बहुतकरून वडिलांचा व्यवसाय सांभाळत पुढे न्यायचा. व्यवसायाच्या नव्या वाटा खूप कमी लोक चोखाळायचे. तेव्हा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही मर्यादित होता. काळानुरूप या सर्व गोष्टींमध्ये बदल झालेत. जागतिकीकरण, औद्योगीकरण आणि शहरीकरणाच्या या जगात शिक्षणाची नवनवीन दालने खुली झालीत. व्यवसायानुरूप अभ्यासक्रम तयार झालेत आणि आपल्याला आवड असलेल्या विषयाचा अभ्यासक्रम निवडून त्याच्याशी संबंधित व्यवसाय तसेच नोकरी करण्याच्या संधी ही उपलब्ध झाल्यात. त्यामुळेच करिअरची निवड ही मुले आणि पालकांच्या जीवनातील महत्त्वाची आणि बहुतेक वेळा गोंधळून टाकणारी बाब ठरायला लागली. स्पेशलायझेशन आणि आता सुपर स्पेशलायझेशनच्या या काळात अभ्यासक्रमांमध्ये इतकी विविधता आली, अचूक पर्याय निवडून संधीचा फायदा करून घेणे हे महत्त्वाचे ठरायला लागले. खरंतर करिअर म्हणजे ज्या विषयात आपल्याला रुची आहे अशा विषयाचा सखोल अभ्यास करून त्या विषयाशी निगडित काम कायमस्वरूपी करणे.

करिअरसाठीच्या विविध पर्यायांची माहिती करून घेणे, आपले शिक्षण, क्षमता लक्षात घेऊन गरज पडल्यास तज्ज्ञ मंडळीचा सल्ला किंवा त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या साहाय्याने त्यातले बारकावे समजून घेणे आणि मग त्या क्षेत्रातले आपले ध्येय ठरवून वाटचालीला सुरुवात करणे हे करिअर निवडीतले महत्त्वाचे टप्पे आहेत.

करिअरमधले आपले ध्येय निश्चित केल्यानंतर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

  • आयुष्यातील आपला प्राधान्यक्रम ठरवून त्याला चिकटून राहायला शिका. त्यासाठी आपले स्वतःचे Do's and Don'ts ठरवा.

  • आपल्या वेळेचे सुयोग्य नियोजन करा. आपल्या ध्येयासाठी आणि स्वतःसाठी वेळ द्या. स्वतः बद्दल विचार करा. त्यामध्ये माझं शिक्षण, क्षमता, माझ्या चुका, प्रगती आणि माझ्या कामासाठी माझ्याकडून झालेले प्रामाणिक प्रयत्न यांचा विचार करा.

  • वर्तमानाशी जुळून राहण्यासाठी आपल्या जीवनाचं संयोजन करायला शिका. संयोजन म्हणजे आपल्या प्राधान्यक्रमानुसार कार्य करताना नवीन येणाऱ्या संधी व बाहेरील जगातील यशापयशाचे बदलणारे मापदंड यामधील संतुलन.

  • आपल्या अमूर्त संकल्पनांना साकार करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि कुठेही थांबवू नका चालत राहा.

  • नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. ध्येय गाठण्यासाठी उद्दिष्टांचे टप्पे ठरवून ते पूर्ण करायला शिका. सरतेशेवटी यश मिळवण्यासाठी आपले करिअर कधीच थांबत नसते, त्यामुळे त्याला स्वतः इतकंच महत्त्व द्यायला शिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com