SBI बँकेचा मोठा निर्णय; फार्मासिस्ट, डेटा अॅनालिस्ट Online परीक्षा ढकलली पुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SBI Exam

SBI बँकेचा मोठा निर्णय; फार्मासिस्ट, डेटा अॅनालिस्ट Online परीक्षा ढकलली पुढे

SBI Exam 2021 : भारतीय स्टेट बँकने (एसबीआय) फार्मासिस्ट आणि डेटा अॅनालिस्ट पदांवरील भरतीसाठी विहित निवड प्रक्रियेंतर्गत घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा (SBI Exam) पुढे ढकलली आहे. एसबीआय फार्मासिस्ट ऑनलाइन परीक्षा 2021 आणि डेटा अॅनालिस्ट ऑनलाइन परीक्षा 2021 पुढे (Pharmacist And Data Analyst Exam) ढकलण्याबाबत बँकने मंगळवार 18 मे रोजी नोटीस जारी केली आहे. दरम्यान, एसबीआय फार्मासिस्ट आणि डेटा अॅनालिस्ट ऑनलाइन परीक्षा 23 मे 2021 रोजी घेण्यात येणार होती. गेल्या दोन आठवड्यात एसबीआयने दोन्ही पदांसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेचे प्रवेश पत्रही जारी केले होते. (SBI Pharmacist And Data Analyst Exam Postponed)

देशभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या दुसऱ्या टप्प्यातील संक्रमणाची वाढती संख्या लक्षात घेता, स्टेट बँकेने फार्मासिस्ट आणि डेटा अॅनालिस्टच्या ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. एसबीआयने दिलेल्या अधिकृत नोटिसीनुसार, कोविडच्या पार्श्वभूमीवर 23 मे 2021 रोजी घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा पुढील सूचना येईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: UGC NET परीक्षेची लवकरच घोषणा; तारखाही होणार जाहीर?

परीक्षा 120 मिनिट आणि 200 गुणांची असेल

एसबीआयतर्फे फार्मासिस्ट आणि डेटा अॅनालिस्टच्या पदांवरील भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा साथीच्या आजारामुळे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षा ही वस्तुनिष्ठ चाचणी असेल, ज्यासाठी एकूण 120 मिनिटांची वेळ निश्चित केली गेली आहे. या परीक्षेत एकूण 200 गुण असतील, ज्यात विविध विषयांचे एकूण 5 विभागही असणार आहेत. एसबीआयने फार्मासिस्ट आणि डेटा अ‍ॅनालिस्ट परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी अभ्यासक्रम आणि योजनेची माहिती जाहीर केली आहे, तर दुसरीकडे भरती अधिसूचनामध्ये बँकेने उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी एक नमुना प्रश्नपत्रिका देखील दिली आहे.

SBI Pharmacist And Data Analyst Exam Postponed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Exam PostponedSBI Exam
loading image
go to top