UGC NET परीक्षेची लवकरच घोषणा; तारखाही होणार जाहीर?

एक महिन्यापूर्वी 20 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने कोविडच्या वाढत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती.
UGC NET
UGC NETesakal

UGC NET Admit Card 2021 : देशभरात पसरलेल्या कोविड (Coronavirus) साथीच्या आजारामुळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात येणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता परीक्षांच्या (एनटीए) नवीन तारखांबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. एनटीएने 2 ते 17 मे या कालावधीत डिसेंबर 2020 च्या यूजीसी नेट परीक्षा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, युजीसी नेटच्या परीक्षांसाठी लवकरच सरकार कोणतीही घोषणा करू शकते. परीक्षा आयोजित करण्याच्या नवीन तारखांसह यूजीसी नेट प्रवेशपत्र 2021 डाउनलोडसाठी उपलब्ध करुन देण्याच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात, असेही युजीसीने म्हटले आहे. (UGC NET Exam Will Be Held Soon)

दरम्यान, एक महिन्यापूर्वी 20 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने कोविड साथीच्या वाढत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2020 च्या काळातील मे 2021 मध्ये प्रस्तावित परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. एजन्सीने आपल्या नोटिसमध्ये म्हटले आहे, की मे 2021 परीक्षेच्या नवीन तारखांच्या किमान 15 दिवस आधी उमेदवारांना सूचित केले जाईल.

UGC NET
CLAT प्रवेश परीक्षेसाठी आज शेवटची मुदत; 'असा' भरा Online अर्ज

यूजीसी नेट मे 2021 साठी 'हेल्पलाइन'

एनटीएने यूजीसी नेट मे 2021 च्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे संबंधित उमेदवारांचे प्रश्न सोडविण्यासाठी हेल्पलाइन जारी केली आहे. ज्या उमेदवाराला यूजीसी नेट परीक्षा किंवा प्रवेश पत्र संबंधित काही प्रश्न असतील, त्यांनी एजन्सीच्या हेल्पलाइन 011-4075900 वर कॉल करून किंवा ugcnet@nta.ac.in वर ईमेल करून माहिती मिळवू शकतात.

UGC NET Exam Will Be Held Soon

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com