esakal | SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; 'या' पदासाठी होणार भरती
sakal

बोलून बातमी शोधा

Job

देशातील सर्वात मोठ्या SBI बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यात तरुणांना करिअर (Career) करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; 'या' पदासाठी होणार भरती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देशातील सर्वात मोठ्या SBI बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यात तरुणांना करिअर (Career) करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) डिसेंबर 2020 मध्ये फायर इंजिनिअरच्या 16 जागांसाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यासाठी 11 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र, कोरोना साथीच्या (Coronavirus) रोगामुळे या उमेदवारांना अर्ज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. (SBI Recruitment 2021 More Than 40000 Salary In This Post In sbi This Qualification Is Required Safalta)

या व्यतिरिक्त, अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्जही चुकले होते. या सर्व अडचणी लक्षात घेता, स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. एसबीआयने जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, आता उमेदवार भरतीसाठी 15 जून 2021 पासून बँकेच्या https://www.sbi.co.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरू शकतात. यासाठी शेवटची तारीख 28 जून 2021 आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार www.safalta.com यावर सुरू असलेल्या मोफत लाइव्ह क्लासेसमध्येही या लिंकच्या सहाय्याने https://www.safalta.com/free-courses-21 येथे सहभागी होऊ शकतात.

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज सादर करण्याची तारीख - 15 जून 2021

  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 28 जून 2021

  • दुरुस्तीची अंतिम तारीख - 28 जून 2021

पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवाराने नागपूर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधील (एनएफएससी) बीई (फायर) बीटेक, बी.ए. (सुरक्षा आणि अग्निशमन अभियांत्रिकी), बी.टेक / बी.ई. (अग्नि तंत्रज्ञान आणि सुरक्षा अभियांत्रिकी) अथवा बीएससी (फायर) पदवी घेतलेली असावी. या व्यतिरिक्त, यूजीसी / एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांकडून चार वर्षांची पदवी घेतलेली असावी.

अर्ज फी : या भरतीसाठी उमेदवारांना 750 रुपये फी भरावी लागेल.

पगार : उमेदवारांना 23700 - 980/7 - 30560 - 1145/2 - 32850 - 1310/7 - 42020 म्हणून पगार देण्यात येईल.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीव्दारे करण्यात येणार आहे.

हेही वाचा: 'डिस्टन्स'मधून B.Ed करायचं आहे? जाणून घ्या किती वर्षाचा कोर्स अन् महत्वपूर्ण माहिती

'एसबीआय'मध्ये बनवू शकता करिअर

जर तुम्हाला स्टेट बँकेत करिअर करायचं असेल आणि तुम्ही ज्युनिअर असोसिएट पदांच्या भरतीसाठी अर्ज केला असेल, तर या परीक्षेपूर्वी आपली तयारी अधिक चांगली होण्यासाठी www.safalta.com या वेबसाइटवरील अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकता. एसबीआयने नुकत्याच लिपीक स्तरावर 5,454 जागा रिक्त केल्या आहेत, त्यासाठी जून महिन्यात प्रिलिम्सची परीक्षा देखील होणार होती. पण, कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. परंतु परिस्थिती सुधारल्यास परीक्षा कधीही होऊ शकते, असे त्यांनी जाहीर केले आहे.

SBI Recruitment 2021 More Than 40000 Salary In This Post In sbi This Qualification Is Required Safalta

loading image