esakal | SBI बँकेत पदवीधरांसाठी बंपर भरती; 600 हून अधिक पदांवर मिळणार 'नोकरी' I SBI Bank
sakal

बोलून बातमी शोधा

SBI Recruitement 2021

देशात सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने विविध पदांच्या भरतीसाठी नुकतेच अर्ज मागविले आहेत.

SBI बँकेत पदवीधरांसाठी बंपर भरती; 600 हून अधिक पदांवर मिळणार 'नोकरी'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

SBI Recruitement 2021 : भारतीय स्टेट बँकेमध्ये (SBI) सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमदेवारांसाठी खुशखबर आहे. देशातली सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियात वेल्थ मॅनेजमेंट बिझनेस यूनिटमध्ये स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (SCO) पदांसह एकूण तीन भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या माध्यमातून एकूण 606 पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत SBI च्या अधिकृत वेबसाइटला sbi.co.in भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

SBI Recruitement Eligibility : पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता थोडी वेगळीय. याशिवाय, वयोमर्यादा देखील स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आलीय. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इत्यादी तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत 'अधिसूचना' तपासू शकतात.

हेही वाचा: आर्मीत नोकरीची मोठी संधी! 10 वी विद्यार्थ्यांनाही करता येणार अर्ज

महत्वाच्या तारखा

  • अर्ज प्रक्रियेची तारीख : 29 सप्टेंबर 2021

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2021

अर्ज फी : या पदांवर अर्ज करण्यासाठी SBI ने GEN / EWS / OBC साठी 750 रुपये अर्ज शुल्क निश्चित केलंय, तर इतर आरक्षित वर्गासाठी कोणतेही शुल्क निश्चित केलेले नाही.

या पदांवर भरतीशी संबंधित शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष, वेतनश्रेणी, वेतन संबंधित इतर माहितीसाठी उमेदवार sbi.co.in ला भेट देऊ शकतात.

हेही वाचा: खुशखबर! PWD विभागात सरकारी नोकरीची संधी; 'या' पदांवर लागणार लाॅटरी

पदाचे नाव व पद संख्या

1) मॅनेजर (मार्केटिंग) - 12

2) डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) - 26

3) एक्झिक्युटिव्ह - 01

4) रिलेशनशिप मॅनेजर - 314

5) रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) - 20

6) कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव - 217

7) इन्वेस्टमेंट ऑफिसर - 12

8) सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) - 02

9) सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) -02

हेही वाचा: 'TET' परीक्षाही पुढे ढकलणार; सरकारकडून आज अंतिम घोषणेची शक्यता!

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य    (ii) 05 वर्षे अनुभव 

पद क्र.2 : (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य    (ii) 02 वर्षे अनुभव 

पद क्र.3 : (i) 50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4 : (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव 

पद क्र.5 : (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव 

पद क्र.6 : पदवीधर  

पद क्र.7 : (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) 05 वर्षे अनुभव 

पद क्र.8 : (i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव 

पद क्र.9 : (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव 

वयाची अट : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

loading image
go to top