esakal | आधार नोंदणी नसली तरी विद्यार्थ्यांची होणार पटनोंदणी; शिक्षण संचालकांचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

आधार नोंदणी

आधार नोंदणी नसली तरी विद्यार्थ्यांची होणार पटनोंदणी; शिक्षण संचालकांचे आदेश

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये (School) असलेल्या विद्यार्थ्यांची (students) आधार नोंदणी (Aadhar registration) आणि त्यांची बायोमॅट्रिक उपलब्ध नसल्यास शाळांची पटनोंदणी (School attendance report) करून शाळांची संचमान्यता केली जाणार आहे.यासाठी शिक्षण संचालनालयाने (Education Authorities) नवीन आदेश (new order) जारी केले आहेत.

हेही वाचा: पत्नीने दुसरा विवाह केला नसेल तर पतीच्या मालमत्तेमध्ये हिस्सा - हायकोर्ट

या आदेशामुळे राज्यातील स्थनिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित आदी शाळांना आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि त्याच्या अद्ययावतीकरण केलेली माहिती नसली तरी त्यांची पट नोंदणी करून शाळांची संच मान्यता केली जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आधार आणि त्याची माहिती नसल्याने मोठ्या प्रमाणात पटनोंदणीत गैरप्रकार समोर येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

शिक्षण संचालनालयाने राज्यातील पहिली ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अद्ययावत करण्याचे काम संबंधित शाळांच्या व्यवस्थापनांनी पूर्ण करणेबाबत आदेश दिले आहेत. त्यात विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचे काम ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करावे. यापुढील संचमान्यता केवळ आधार नोंदणी झालेल्या (बायो मॅट्रिक असो किंवा नसो) विद्यार्थ्यांच्या पटसंख्य आधारे करण्यात येणार आहे. यात जर विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करणे अपूर्ण राहिले तर कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी उपलब्ध होतील. त्यामुळे सर्व शाळा व्यवस्थापक, मुख्याध्यापक यांनी यासाठी कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.

loading image
go to top