UGC NET Postponed : फेज II परीक्षा पुढे ढकलली; जाणून घ्या, नवीन तारखा

यापूर्वी UGC NET फेज 2 ची परीक्षा 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार होती.
UGC NET exam
UGC NET examsakal media

UGC NET JRF 2022 Postponed : विद्यापीठ अनुदान आयोगाने UGC NET चा दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, आता ही परीक्षा 20 ते 30 सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष प्रो. एम जगदेश कुमार यांनी स्वतः याबाबत ट्विट करून याची घोषणा केली आहे. यापूर्वी UGC NET फेज 2 ची परीक्षा 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार होती.

प्रोफेसर कुमार यांनी माहिती दिली की, UGC NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 विलीन सत्राची अंतिम फेज-2 परीक्षा आता 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 64 विषयांसाठी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट घेतली जाईल. यापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 12, 13 आणि 14 ऑगस्ट 2022 रोजी होणार होती. जी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

UGC NET exam
CM शिंदेंपेक्षाही KCR आघाडीवर; 68 दिवस हाकला होता एका मंत्र्यावर राज्याचा गाडा

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांनी ट्विटद्वारे सांगितले की, एनटीएने 09, 11 आणि 12 जुलै 2022 रोजी देशभरातील 225 शहरांमधील 310 परीक्षा केंद्रांवर 33 विषयांसाठी डिसेंबर 2021 आणि जून 2022 रोजी पहल्या टप्प्यातील परीक्षा आयोजित केली होती. तर दुसरा टप्प्यातील परीक्षा यापूर्वी 12, 13 आणि 14 ऑगस्ट 2022 रोजी होणार होती. तथापि, आता UGC-NET चा शेवटचा टप्पा 20 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत होणार असून, 11 सप्टेंबर 2022 रोजी NTA च्या वेबसाईटवर प्रवेशपत्र जारी केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना हे प्रवेशपत्रं 16 सप्टेंबर 2022 रोजी NTA च्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com