esakal | अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत १५,९६७ विद्यार्थ्यांची निवड
sakal

बोलून बातमी शोधा

admission

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत १५,९६७ विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे: इयत्ता अकरावीच्या (11th) केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतंर्गत दुसऱ्या(second Round) नियमित फेरीत तब्बल १५ हजार ९६७ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. तर सुमारे सहा हजार ४० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. या फेरीत महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत (ता.६) प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

हेही वाचा: Pune : पावसाळी गटारांवरील लोखंडी झाकणे चोरणाऱ्यांना अटक

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशाकरिता ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी एकूण ६३ हजार ७५७ जागा उपलब्ध होत्या. या जागांवरील प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीत ३५ हजार ६९४ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यातील १५ हजार ९६७ विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली आहेत. तर उर्वरित १९ हजार ७२७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत महाविद्यालये मिळू शकलेली नाहीत.

या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ‘प्रोसिड फॉर अॅडमिशन’वर क्लिक करणे, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि प्रवेश निश्चित करणे यासाठी सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे.

दुसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शाखानिहाय संख्या :

शाखा : उपलब्ध जागा : एकूण अर्ज : एकूण महाविद्यालये अॅलॉट झालेले विद्यार्थी

कला : ११,३२१ : ३,२८७ : १,८३५

वाणिज्य : २५,६८८ : १४,३०२ : ६,६७३

विज्ञान : २३,६४० : १७,५८४ : ७,१२१

एचएसव्हीसी : ३,१०८ : ५२१ : ३३८

एकूण : ६३,७५७ : ३५,६९४ : १५,९६७

शाखानिहाय पसंतीक्रमानुसार महाविद्यालये मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या :

पसंतीक्रम : कला : वाणिज्य : विज्ञान : एसएसव्हीसी : एकूण

१ : ९०९ : २,५६८ : २,२३६ : ३२७ : ६,०४०

२ : ३३८ : १,३४८ : १,५३९ : ०६ : ३,२३१

३ : १७४ : ८४० : ९७१ : ०३ : १,९८८

४ : १५६ : ६२२ : ६६० : ०२ : १,४४०

५ : १०९ : ४०८ : ४७५ : ०० : ९९२

विद्यार्थ्यांनी टक्केवारी आणि 'कट-ऑफ' यानुसार निवडा महाविद्यालय

‘‘ बहुतांश विद्यार्थी हे केवळ फर्ग्युसन महाविद्यालय, बीएमसीसी, सर परशुरामभाऊ महाविद्यालय केवळ अशाच नामांकित महाविद्यालयांची नावे पसंतीक्रमात देत आहेत. परंतु नामांकित महाविद्यालयांचा ‘कट-ऑफ’ आणि त्या तुलनेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पाहता, अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या नियमित फेरीत प्रवेश मिळू शकलेला नाही, हे वास्तव आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले गुण आणि महाविद्यालयांच्या ‘कट-ऑफ’चा अभ्यास करून अर्जात महाविद्यालयांचा पसंतीक्रम देणे किंवा बदलणे आवश्यक आहे. तरच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये पटकन अॅलॉट होऊ शकणार आहेत.’’ - मीना शेंडकर, सदस्य सचिव, इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया समिती

loading image
go to top