ShareChat Layoffs : मंदीचे मळभ अधिक गडद! लोकप्रिय भारतीय कंपनीकडून 500 कर्मचाऱ्यांना नारळ

कर्मचारी कपातीचा निर्णयाची पुष्टी करताना कंपनीचे प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले आहे.
ShareChat
ShareChatSakal

ShareChat Layoffs News : भारतातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ShareChat ने पुन्हा एकदा मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

ShareChat
Vodafone Layoff : पुढील 5 वर्षात Vodafone मध्ये होणार सर्वात मोठी कर्मचारी कपात; वाचा काय आहे कारण

याआधी फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म बंद करून 5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता कंपनीने 20 टक्के कर्मचारी कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे सुमारे 500 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखववण्यात आला आहे.

काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करण्यात आलेली ही छाटणी कोणत्या विभागात करण्यात आलेली आहे याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ShareChat
Ola Layoff : दिग्गज कंपन्यांनंतर ओलामध्ये होणार इतक्या कर्मचाऱ्यांची कपात

'कठीण आणि वेदनादायक निर्णय'

कर्मचारी कपातीचा निर्णयाची पुष्टी करताना कंपनीचे प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी “एक कंपनी म्हणून आम्हाला आमच्या इतिहासातील सर्वात कठीण आणि वेदनादायक निर्णय घ्यावे लागत आहे.

या निर्णयातंर्गत आमच्या प्रतिभावान कर्मचार्‍यांपैकी अंदाजे 20 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

ShareChat
Amazon Layoffs : केवळ मेल करून कामावरुन काढलं; कंपनी ५ महिन्यांचा पगार देणार

दरम्यान, काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोटीस कालावधीचा पूर्ण पगार, कंपनीशी संबंधित प्रत्येक वर्षासाठी दोन आठवड्यांचा पगार आणि डिसेंबर 2022 पर्यंत बदलत्या वेतनाचे 100% पेमेंट दिले जाणार आहे. याशिवाय उर्वरित सुट्ट्यांच्या बदल्यात 45 दिवसांपर्यंतचे पेमेंटही दिले जाणार आहे.

2015 मध्ये झाली सुरुवात

शेअरचॅट हे भारतातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. भारतात याचे 400 दशलक्ष वापरकर्ते आहेत. 2015 मध्ये अंकुश सचदेवा, भानू प्रताप सिंह आणि फरीद अहसान यांनी मिळून याची सुरूवात केली होती. शेअरचॅट व्यतिरिक्त कंपनी Moj प्लॅटफॉर्म देखील चालवते, जे वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com