esakal | राज्य शासनाकडून धक्कादायक खुलासा; 'Shikshaaabhiyan.org' वेबसाईट Fake; पोलिसांत तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Shikshaaabhiyan

सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र, त्या संदेशाची कोणतीही खातरजमा न करता तो संदेश आहे असा, पुढे फाॅरवर्ड करण्यात अनेक लोक धान्यता मानत आहेत.

राज्य शासनाकडून धक्कादायक खुलासा; 'Shikshaaabhiyan.org' वेबसाईट Fake; पोलिसांत तक्रार

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : सध्या सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र, त्या संदेशाची कोणतीही खातरजमा न करता तो संदेश आहे असा, पुढे फाॅरवर्ड करण्यात अनेक लोक धान्यता मानत आहेत. त्यामुळे याचा परिणाम काय होणार याची पुसटशी कल्पनाही काहींना नसल्यामुळे याचा गंभीर परिणाम भोगावा लागण्याची शक्यता आहे. सध्या शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) तुम्ही अर्ज करत असाल, तर वेळीच सावध राहणं गरजेचं आहे. कारण, shikshaaabhiyan.org या वेबसाईटवरुन तुम्ही शिक्षक किंवा इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज केला असेल, तर यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आलीय. Shikshaaabhiyan.org ही वेबसाईट बनावट असून त्याचा शासनाशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा राज्य शासनाने केला आहे. शिवाय यासंदर्भात मुंबईतील मरिन लाईन्स पोलिस स्थानकात (Marine Lines Police Station) राज्य शासनानं (State Government) तक्रारही दाखल केलीय. (shikshaaabhiyan-website-is-fake-clarifies-maharashtra-government-case-filed-in-marine-lines-police-station)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत होता. मात्र, हा संदेश शासनाचा असल्याने काहीजण याकडे डोळे झाकून विश्वास ठेवत होते. Shikshaaabhiyan.org ही वेबसाईट कार्यरत आहे. सध्या ही वेबसाइट वेगळ्या कारणांनी चर्चेत आली आहे. या वेबसाईटवर वेगवेगळ्या पदांसाठी म्हणजेच, सर्व शिक्षा अभियान भरती 2021 या मथळ्याखाळी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी, त्याचप्रमाणे यासंदर्भातील शिक्षक भरतीमधील इतर पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. तसेच या वेबसाईटवर अनेक शिक्षकांनी अर्ज केले होते. मात्र, याबाबत शिक्षण विभागानं (Education Department) एक धक्कादायक खुलासा केला आहे.

हेही वाचा: NEET UG परीक्षेसाठी 'Application Form' लवकरच होणार जाहीर

शिक्षण विभागानं सांगितलंय की, Shikshaaabhiyan.org ही वेबसाईट आणि राज्य शासनाचा कोणताही संबंध नाही. शिवाय ही वेबसाईट बनावट आहे. तसेच सध्या कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती सुरु नाही, त्यामुळे अशा बटावट जाहिरातीवर विश्वास ठेवून कोणत्याही प्रकारचा अर्ज करु नका, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. त्यामुळे ज्यांनी हा अर्ज भराला आहे, त्यांची गोची झाली आहे.

shikshaaabhiyan-website-is-fake-clarifies-maharashtra-government-case-filed-in-marine-lines-police-station