संधी रोजगाराच्या : मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे महत्त्व 

डॉ. शीतलकुमार रवंदळे 
Thursday, 4 June 2020

अभियांत्रिकीच्या विविध शाखांपैकी महत्त्वाची मूलभूत शाखा म्हणजे मेकॅनिकल. या क्षेत्रात करिअरच्या संधी गेल्या अनेक दशकापासून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. 

अभियांत्रिकीच्या विविध शाखांपैकी महत्त्वाची मूलभूत शाखा म्हणजे मेकॅनिकल. या क्षेत्रात करिअरच्या संधी गेल्या अनेक दशकापासून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. 

आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू बनविण्यासाठी लागणारे डिझाइन, संशोधन, क्वालिटी, मॅन्युफॅक्चरिंग या सर्वच गोष्टींशी निगडित शाखा म्हणजे, मेकॅनिकल होय. फक्त ऑटोमोबाईल नव्हे तर सर्वच प्रकारच्या कारखान्यातील मशिनरी, तसेच बांधकाम क्षेत्रातील व शेतीशी निगडित सर्व यंत्रे तयार करण्यासाठी मेकॅनिकल शाखेतील अभियंतेच उपयुक्त ठरतात. 

संधी रोजगाराच्या :  कोरोनाचा कॅम्पस प्लेसमेंटवर परिणाम 

भारत सरकारच्या मेक इन इंडिया, स्कील इंडिया यांसारख्या फायदेशीर उपक्रमांमुळे व भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी होणाऱ्या उत्पादन क्षेत्रातील घडामोडींमुळे येणाऱ्या काळात मेकॅनिकल शाखेच्या अभियंत्यांना चांगली मागणी असणार आहे. त्याचप्रमाणे उद्योजक बनण्यासाठी मेकॅनिकलच्या विद्यार्थांना चांगली संधी आहे. 

पुढील तक्त्यातील आकडेवारीनुसार अभियांत्रिकीकडे व त्यात देखील मेकॅनिकल शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल दिसतो. अभियांत्रिकीच्या ३८.५२ लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे ७.८ लाख विद्यार्थी हे मेकॅनिकल शाखेचे आहेत. 

मेकॅनिकल अभियंत्यांना रोजगार देणारे उद्योगक्षेत्र : 

 • Manufacturing Industry 
 • Power Industry 
 • Research & Development Industry 
 • Metals & Mining Industry 
 • Automobile Industry 
 • Construction Industry 
 • Consumer Goods Industry 
 • Defense Industry 
 • Electronics Industry 
 • Marine Industry 
 • Rail Industry 
 • Utility Industry 
 • Chemical Industry 

मेकॅनिकल शाखेतील विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञान वाढविण्यासाठी SAE BAJA, SAE SUPRA, KPIT Sparkle, SAE Tifan, Robocon, Aakruti Dassault system स्पर्धा, EFFI-CYCLE या सारख्या स्पर्धांमध्ये नियमित भाग घ्यायला हवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shitalkumar ravandale article importance of mechanical engineering