esakal | अर्धवट शाळा सोडलेल्यांना कौशल्य विकासचा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

skill development w

अर्धवट शाळा सोडलेल्यांना कौशल्य विकासचा आधार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आर्थिक, सामाजिक आणि इतर विविध कारणांमुळे अर्धवट शाळा सोडणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम आणले आहेत. यात पूर्णवेळ आणि अर्धवेळ अशी 301 अभ्यासक्रम उपलब्ध असून या अभ्यासक्रमांचा मोठा आधार शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. (skill development is support for those who have dropped out of school aau85)

हेही वाचा: कोरोनात आता नवं संकट; चीनमध्ये Monkey B विषाणूचा पहिला बळी!

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम (ॲड ऑन कोर्सेस) चालविण्यात येतात. सध्या मंडळांतर्गत विविध 28 गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार, तसेच सहा महिने कालावधीचे 156, एक वर्ष कालावधीचे 100 आणि दोन वर्ष कालावधीचे 45 अर्धवेळ (234) व पूर्णवेळ (67) असे एकुण 301 अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम जिल्हा, तालुकास्तरावर तसेच ग्रामीणभागात मंडळाने मान्यता दिलेल्या 1 हजार 269 संस्थांमध्ये राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा: जामिया विद्यापीठात होणार दानिश सिद्दीकींचा दफनविधी

हे अभ्यासक्रम खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतात, असे मलिक यांनी सांगितले.

loading image