Sleep
sakal
कार्यक्षम, उत्साही राहण्यासाठी व भावनिक समतोलासाठी, एकूणच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शांत झोप अत्यावश्यक आहे. विद्यार्थिदशेत तसेच युवावस्थेत पुरेशा प्रमाणात झोपेची नितांत आवश्यकता असते. मेंदूची कार्यक्षमता, संप्रेरकांची, पेशींची निर्मिती आणि इतर महत्त्वाची कार्ये झोपेशी संबंधित आहेत. सध्या महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये उशिरापर्यंत जागरणाचा ट्रेंड दिसत आहे. त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होतो, हे लक्षात घेतले पाहिजे.