esakal | आता पहिल्या वर्गातील प्रवेश यादी आज होणार नाही जाहीर ! केंद्रीय विद्यालयाची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

KVS

आता पहिल्या वर्गातील प्रवेश यादी आज होणार नाही जाहीर ! केंद्रीय विद्यालयाची घोषणा

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोव्हिड-19 साथीच्या आजारामुळे शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सत्र 2021-22 च्या प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. केंद्रीय विद्यालय संगठन (केव्हीएस) सध्या देशभरातील विविध केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता पहिली वर्गाच्या शैक्षणिक सत्र 2021-22 मधील प्रवेशासाठी विहित प्रवेश प्रक्रियेनुसार प्रवेश यादी जाहीर करण्याच्या टप्प्याला स्थगिती दिली आहे.

केव्हीएस वर्ग 1 प्रवेश यादी 2021 आज अर्थात 23 एप्रिल रोजी जाहीर होणार होती. केव्हीएसने केंद्रीय विद्यालयाच्या प्रथम श्रेणी अधिकृत प्रवेश पोर्टल kvsonlineadmission.kvs.gov.in वर जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, देशातील कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन 23 एप्रिल रोजी वर्ग एकच्या प्रवेशासाठी होणारी लॉटरी पुढे ढकलली आहे.

नवीन तारीख केली नाही जाहीर

वर्ग एकची प्रवेश यादी जाहीर करण्याच्या नव्या तारखेस व पुढील टप्प्यासाठीच्या कार्यक्रमासंदर्भात केंद्रीय विद्यालयाने कोणतेही अपडेट्‌स जाहीर केले नाहीत. तथापि, संघठनने सर्व पालकांना आपल्या मुलाच्या प्रवेशासंदर्भातील अद्ययावत अपडेटसाठी वेळोवेळी केव्हीएस प्रवेश पोर्टलला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केव्हीएसने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, लॉटरी सोडतीच्या नवीन तारखेसाठी वेबसाइट सतत चेक राहा.

दुसरी यादी 30 एप्रिल तर तिसरी 5 मे रोजी जाहीर केली जाणार होती

यापूर्वी केंद्रीय विद्यालयाच्या पहिल्या वर्गात प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी 23 एप्रिलला जाहीर केली जायची आणि दुसरी यादी 30 एप्रिलला जाहीर केली जायची. यानंतर 5 मे रोजी तिसरी यादी जाहीर होणार होती. तथापि, केव्हीएसने हे पूर्व निर्धारित वेळापत्रक पुढे ढकलल्यानंतर सुधारित वेळापत्रक अद्याप जाहीर केले नाही.

loading image