ऑफिसमध्ये अशी राहू देऊ नका आपली बॉडी लॅंग्वेज ! सुधारा "या' पाच चुका

ऑफिसमध्ये अशी राहू देऊ नका आपली बॉडी लॅंग्वेज
Body Language
Body LanguageCanva

सोलापूर : आपल्या कार्यालयात सभ्य भाषा आणि वर्तन असणे अपेक्षित आहे तसेच आपली बॉडी लॅंग्वेज (Body Language) अर्थात देहबोली देखील सभ्य असावी. कारण, आपल्या शरीराची भाषा काहीच न बोलता आपल्याबद्दल बरेच काही सांगते. चला जाणून घ्या, शरीराच्या भाषेशी संबंधित पाच चुका, ज्या आपण कोणत्याही परिस्थितीत टाळल्या पाहिजेत. (Don't let your body language like that while stay in the office)

चूक क्रमांक 1 : खांदे वाकवून बसणे

खांद्याला वाकवून बसणे हे थकल्यासारखे किंवा हार मानण्याचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपले खांदे कार्यालयात वाकले जातात तेव्हा असा अंदाज लावला जातो की आपल्याकडे ऊर्जा नाही. आपल्याला कोणत्याही गोष्टीची जास्त काळजी नाही. आपल्याला कार्यालयीन कामात रस नाही. आपण काम गांभीर्याने घेत नाही. आपले झुकलेले खांदे एकूणच ऑफिसमध्ये आपली निगेटिव्ह प्रतिमा बनवतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपला बॉस किंवा सहकारी आपल्याशी बोलत असतील, तेव्हा सावध राहा. त्यांचे शब्द काळजीपूर्वक ऐका. आपण आपल्या खुर्चीवर जरासे पुढे जा आणि दरम्यान डोके हलवताना दर्शवा की आपण त्यांचे शब्द पाळत आहात. अन्‌ हो, जरुरीपेक्षा जास्त डोके हलवू नका, कारण आपण ढोंग करीत आहात किंवा खूप चिंताग्रस्त आहात असे वाटू शकते.

Body Language
इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षा पुढे ढकलली ! जाणून घ्या सविस्तर

चूक क्रमांक 2 : बोलत असताना इकडे-तिकडे पाहणे

जेव्हा कोणी आपल्याशी बोलत असेल, तेव्हा तुम्ही त्याच्या डोळ्यांकडे पाहावे. इकडे तिकडे पाहणे योग्य मानले जात नाही. याचा अर्थ असा आहे, की आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये कोणतीही रस नाही. परंतु काही लोक समोरच्या व्यक्तींमध्ये असे डोळे लावून पाहतात की समोरच्या व्यक्‍तीकडे पाहतो की घोरून पाहतो हे कळत नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती अस्वस्थ होते. मग काय करावे? समोरच्या व्यक्तीशी बोलताना पाच- सहा सेकंद त्यांच्याकडे पाहावे व नंतर नजर हटवून पुन्हा त्यांच्याकडे पाच-सहा सेकंद पाहावे.

Body Language
माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक परीक्षांसाठी फी जमा करण्यासाठी मुदतवाढ ! जाणून घ्या सविस्तर

चूक क्रमांक 3 : एकदम जवळ येऊन बसणे

जेव्हा आपण कार्यालयात एखाद्या व्यक्ती किंवा लोकांच्या समूहासह बोलत असाल तर आपण आणि त्यांच्या दरम्यान योग्य अंतर आहे, याची विशेष दक्षता घ्यावी लागेल. एकदम जळव जाऊन बोलणे योग्य मानले जात नाही. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट देखील महत्त्वाची आहे, जेव्हा कोणी आपल्याशी बोलण्यास येतो तेव्हा आपल्या कामात व्यस्त होण्याऐवजी त्याकडे लक्ष द्या. आपण कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर काम करत असल्यास किंवा वाचत-लिहीत असाल तर काम करणे थांबवून संभाषण करा. जर आपले कार्य अत्यंत त्वरित आणि महत्त्वाचे असेल तर त्या व्यक्तीस थोड्या वेळाने बोलतो, असे सभ्यपणे सांगा.

चूक क्रमांक 4 : संभाषणादरम्यान हातांची बरीच हालचाल करणे

बरेच लोक बोलत असताना आय कॉन्टॅक्‍ट नियमांचे पालन करतात परंतु त्यांच्या हातांची बोटं काहीतरी वेगळंच करत असतात. उदाहरणार्थ, ते बोटांनी चटकारत असतात किंवा कशाने तरी खेळत असतात. आजकाल लोक अनावश्‍यकपणे मोबाईल स्क्रीनवर स्वाइप करत असतात. ही कृती असे दर्शवते की, समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये तुम्हाला विशेष रस नाही. हातांची जास्त हालचाल देखील हे दर्शविते की आपल्याकडे संयम व लक्ष कमी आहे.

चूक नंबर 5 : हाताची घडी घालून उभारणे

जेव्हा बॉस किंवा इतर सहकारी आपल्याशी बोलत असतील आणि आपण हाताची घडी घालून उभे असाल तेव्हा याचा अर्थ असा, की आपण बचावात्मक पवित्रा घेत आहात आणि संभाषणात फारसा रस घेत नाही. तर पुढच्या वेळी बॉस आपल्याशी बोलत असेल तर सरळ उभे राहा. आपले खांदे आणि हात रिलॅक्‍स मोडमध्ये ठेवा. जर आपण उभे असाल तर आपले दोन्ही हात शरीराच्या पुढील भागावर ठेवा. जर आपण बसले असाल तर खुर्चीवर हात ठेवा.

देहबोलीशी संबंधित या पाच मूलभूत सावधगिरींसह आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य राहील याचीही खबरदारी घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com