इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षा पुढे ढकलली ! जाणून घ्या सविस्तर

कोरोनामुळे इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
Scholarship
ScholarshipEsakal

सोलापूर : महाराष्ट्र स्टेट एक्‍झामिनेशन काउन्सिल (MSCE) ने कोव्हिड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (एमएससीई) ने महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा (Maharashtra Scholarship Exam) इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी स्थगित केली आहे. महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा 23 मे रोजी होणार होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. कोव्हिड विषाणू (Covid-19) परिस्थितीनुसार परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल. यासंदर्भात अधिकृत संकेतस्थळ mscepuppss.in वर नोटीस बजावण्यात आली आहे. (Corona has postponed the Class V and VIII scholarship examinations)

Scholarship
भारतीय तटरक्षक दलाच्या नाविक अन्‌ यांत्रिकी भरती परीक्षेचा निकाल जाहीर ! असे करा चेक

वेबसाइटवर जारी केलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे, की कोरोना व्हायरस साथीच्या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या प्राथमिकतेला लक्षात घेऊन शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. पुढील परीक्षेची तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल. त्याचबरोबर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही आपल्या अधिकृत ट्‌विटर पेजवरून याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या ट्‌विटमध्ये त्यांनी लिहिले आहे, की कोरोना विषाणूच्या साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता 23 मे रोजी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (वर्ग 5) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (वर्ग 8) पुढे ढकलण्यात आली आहे.

Scholarship
नवोदय विद्यालय घेणार नाही 15 मे रोजी पूर्वनियोजित सहावीची प्रवेश परीक्षा

मीडिया रिपोर्टनुसार, महाराष्ट्रातील सुमारे 47,662 शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये नोंदणी केली आहे. या परीक्षेत एकूण 6,32,478 विद्यार्थ्यांना भाग घ्यावा लागणार आहे. त्यापैकी 3,88,335 विद्यार्थी पाचवी वर्गाचे आणि 2,44,143 विद्यार्थी आठवीचे आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिल रोजी होणार होती. त्यानंतर ही परीक्षा 23 मे रोजी होणार होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र बोर्डाने कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच बारावी बोर्ड परीक्षा पुढे ढकलली असून दहावीची परीक्षाही रद्द केल्याची घोषणा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com