IITs अन्‌ IISc मध्ये प्रवेश घेण्यासाठी जेएएम नोंदणीची वाढली मुदत ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JAM

IIITs व IIScमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेएएम नोंदणीची वाढली मुदत

सोलापूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (Indian Institute of Science : IISc) बंगळूरने ज्वॉइंट एडमिशन टेस्ट ऑफ मास्टर्स (JAM) च्या नोंदणीची तारीख वाढविली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जेएएम 2021 साठी अर्ज केलेला नाही ते आता 27 मे 2021 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात. नोंदणी करण्यासाठी आयआयएससीच्या वेबसाइटवरील JOAPS पोर्टलला भेट देऊ शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मेपर्यंत होती. (Extended deadline for JAM registration for admission in IITs and IISc)

हेही वाचा: सर्वच विद्यार्थ्यांची जून ते ऑगस्टमध्ये परीक्षा !

काय आहे जेएएम?

जेएएम प्रवेश परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना जेएएम फॉर्ममध्ये त्यांची पसंतीची संस्था आणि कार्यक्रम निवडणे आवश्‍यक आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार आयआयटी आणि आयआयएससी, एमएससी, जॉइंट एमएससी-पीएचडी, एमएससी पीएचडी ड्युअल डिग्री आणि इतर पदव्युत्तर पदवी कार्यक्रमात तात्पुरत्या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

हेही वाचा: एनटीपीसीमध्ये ट्रेनी एक्‍झिक्‍युटिव्ह इंजिनिअर पदांची भरती !

जेएएम 2021 चा निकाल कधी?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (आयआयएससी), पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेएएम प्रवेश परीक्षा आवश्‍यक आहे. जेएएम 2021 परीक्षा 14 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती, ज्याचा निकाल 20 मार्च रोजी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेतील चाचणी पेपरमधील एकूण 14,725 उमेदवारांनी कटऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

प्रवेश वेळापत्रक

जेएएम 2021 च्या तारखांनुसार तीन टप्प्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पहिली प्रवेश यादी 16 जून रोजी, दुसरी 1 जुलै रोजी आणि तिसरी यादी 16 जुलै रोजी जाहीर केली जाईल. शॉर्टलिस्टेड उमेदवारांना त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समुपदेशनासाठी उपस्थित राहावे लागेल. 20 जुलै रोजी प्रवेश बंद होतील.

असा करा अर्ज

  • टप्पा 1 : jam.iisc.ac.in किंवा joaps.iisc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • टप्पा 2 : मेन पेजवरील जेएएम प्रवेश फॉर्मवर क्‍लिक करा.

  • टप्पा 3 : आवश्‍यक सर्टिफिकेट्‌स प्रविष्ट करून लॉगइन करा.

  • टप्पा 4 : वैयक्तिक तपशील आणि प्राधान्यांचा प्रोग्राम प्रविष्ट करा आणि आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करा.

  • टप्पा 5 : आता अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

  • टप्पा 6 : फॉर्मच्या पावतीची एक प्रिंट आउट घ्या आणि पुढील कामासाठी ती आपल्याकडे ठेवा.

loading image
go to top