सर्वच विद्यार्थ्यांची जून ते ऑगस्टमध्ये परीक्षा !

सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा जून ते ऑगस्ट महिन्यादरम्यान घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन
Exam
ExamMedia Gallery
Updated on

सोलापूर : प्रथम, द्वितीय व तृतीय तथा अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या एकत्रित परीक्षा (Exam) जून ते ऑगस्ट या काळात संपविण्याचे नियोजन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) केले आहे. त्यासंदर्भात अभ्यास मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. त्यात हा निर्णय झाला. ही परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन होणार, याचा निर्णय मात्र झालेला नाही. (The university plans to conduct examinations for all students between June and August)

Exam
लॉकडाउनचा पुढील टप्पा 15 जूनपर्यंत? मृत्यूदराने वाढविली चिंता

जिल्ह्यातील 101 महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत. विद्यापीठासह या सर्व महाविद्यालयांमध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी, फार्मसी, ऑर्किटेक्‍चर, अभियांत्रिकीसह एमए, एमएस्सी, एमकॉमचे अंदाजित 85 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत (जानेवारी- फेब्रुवारीत) द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पार पडली. तर आता पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा तीन सत्रात सुरू आहे. जवळपास 23 हजार 960 विद्यार्थ्यांची प्रथम वर्षात नोंदणी झाली आहे. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांच्या कुटुंबातील सदस्य तथा काही विद्यार्थी कोरोना बाधित आहेत. त्यामुळे 10 ते 12 टक्‍के विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकलेले नाहीत, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठांनी दिली. दरम्यान, जुलै- ऑगस्टमध्ये प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षाची परीक्षा एकत्रित घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे, असा विश्‍वासही परीक्षा विभागाने व्यक्‍त केला आहे. त्यानुसार सुरवातीला द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची तर ऑगस्टमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षाचे नियोजन करण्यात आले आहे.

Exam
ऑनलाइन फसवणूक ! नोकरी, कर्जाच्या आमिषेला शहरातील तरुण बळी

प्रथम वर्षाचा निकाल 15 दिवसांत

महाविद्यालये बंदच असून विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी ऑनलाइन अध्यापन केले आहे. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसतानाही प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा उरकली जात आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा घरबसल्या ऑनलाइन घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. ही परीक्षा ऑनलाइन असून सर्व प्रश्‍न बहुपर्यायी आहेत. दोन तासांची सवलत दिली असून त्यातील एक तास पेपर सोडविण्यासाठी वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. या वेळेत त्यांना 60 पैकी 50 प्रश्‍न सोडवायचे आहेत. ऑनलाइन परीक्षा असल्याने त्यांचा निकाल तयार करण्यासाठी 15 दिवसांचाच अवधी लागणार आहे, असेही विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक विकास कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com