esakal | आयडीबीआय बॅंक भरणार मुख्य डेटा ऑफिसरसह विविध पदे ! जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

IDBI Bank

आयडीबीआय बॅंक भरणार मुख्य डेटा ऑफिसरसह विविध पदे ! जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : आयडीबीआय बॅंकेने विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवली आहे. त्याअंतर्गत चीफ डेटा ऑफिसरसह हेड प्रोग्राम मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी आयटी कम्प्लायन्स, डेप्युटी चीफ टेक्‍नॉलॉजी, चीफ इन्फॉर्मेशन सिक्‍युरिटी ऑफिसर व हेड डिजिटल बॅंकिंग ही पदे भरली जाणार आहेत. त्याअंतर्गत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत पोर्टल idbibank.in वर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी लक्षात ठेवावे, की या पदावर ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे 2021 आहे.

भरती प्रक्रियेचा तपशील

  • चीफ डेटा ऑफिसर : 1 पद

  • हेड प्रोग्राम मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी : 1 पद

  • डेप्युटी चीफ टेक्‍नोलॉजी ऑफिसर : 1 पद

  • डेप्युटी चीफ टेक्‍नॉलॉजी ऑफिसर : 1 पद

  • चीफ इन्फॉर्मेशन सिक्‍युरिटी ऑफिसर : 1 पद

  • हेड डिजिटल बॅंकिंग : 1 पद

आयडीबीआय बॅंकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार चीफ डेटा ऑफिसर पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून 18 ते 20 वर्षांचा आयटी अनुभव असावा. डेप्युटी चीफ टेक्‍नोलॉजी ऑफिसर पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील आयटी क्षेत्रात 18 ते 20 वर्षांचा अनुभव असावा.

ही आहे वयाची अट

हेड-डिजिटल बॅंकिंग आणि सीआयएसओ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 45 वर्षे व जास्तीत जास्त 55 वर्षे असणे आवश्‍यक आहे.

loading image