esakal | MES Application 2021 : ड्राफ्ट्‌समन व सुपरवायझरच्या 572 पदांसाठी होणार भरती !

बोलून बातमी शोधा

Draftaman
MES Application 2021 : ड्राफ्ट्‌समन व सुपरवायझरच्या 572 पदांसाठी होणार भरती !
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेस (एमईएस) मधील ड्राफ्ट्‌समन आणि सुपरवायझर (बी/एस) पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 मार्च 2021 पासून सुरू आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप अर्ज केलेले नाही ते अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी mes.gov.in वर भेट द्यावी.

या आहेत महत्त्वाच्या तारखा आहेत

  • ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख : 17 मे 2021

  • फी भरण्याची शेवटची तारीख : 17 मे 2021

  • लेखी परीक्षेची तारीख : 20 जून 2021

या भरती अंतर्गत एकूण 572 जागा रिक्त आहेत. यात सुपरवायझरच्या 458 आणि ड्राफ्ट्‌समनच्या 114 पदांचा समावेश आहे. यापूर्वी एकूण 502 पदांसाठी अधिसूचना जारी केली गेली. तथापि, रिक्त जागांची संख्या नंतर वाढविण्यात आली. त्याचवेळी आधीच्या वेळापत्रकानुसार 16 मे 2021 रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. तर, अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविल्यानंतर आता लेखी परीक्षा 20 जून 2021 रोजी घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

मान्यताप्राप्त संस्थांकडून आर्किटेक्‍चरल असिस्टंटशिपमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा केलेले उमेदवार ड्राफ्ट्‌समन पदासाठी अर्ज करू शकतात. तर सुपरवायझर पदासाठी उमेदवाराकडे इकॉनॉमिक्‍स / कॉमर्स / स्टेटिस्टिक्‍स / बिझनेस स्टडीज / पब्लिक एडमिनिस्ट्रेशन या विषयांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 30 वर्षे असावे. तथापि, आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येणार आहे. तपशिलासाठी आपण सूचना तपासू शकता.

अशी राहील निवड प्रक्रिया

लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. निवड प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सूचना पाहू शकता.