esakal | महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये 2428 ग्रामीण डाक सेवकांची होणार भरती ! जाणून घ्या सविस्तर

बोलून बातमी शोधा

Post
महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये 2428 ग्रामीण डाक सेवकांची होणार भरती ! जाणून घ्या सविस्तर
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक पदांवर भरतीसाठी ऑनलाइन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत एकूण 2428 पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट @appost.in वर जाऊन अर्ज करू शकतात. त्याचबरोबर या पदांच्या अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून 26 मे 2021 पर्यंत चालणार आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करावयाचे आहे त्यांनी अधिसूचना व्यवस्थित वाचल्यानंतर अर्ज करावा; कारण अर्जात काही त्रुटी आढळल्यास अर्ज फेटाळला जाईल.

रिक्त पदांचा तपशील

  • यूआर : 1105

  • ईडब्ल्यूएस : 246

  • ओबीसी : 565

  • पीडब्ल्यूडी ए : 10

  • पीडब्ल्यूडी बी : 23

  • पीडब्ल्यूडी सी : 29

  • पीडब्ल्यूडी डीई : 15

  • एससी : 191

  • एसटी : 244

महाराष्ट्र पोस्टल सर्कलने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जीडीएसच्या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा पर्यायी विषय म्हणून अभ्यास केलेला) विषयात दहावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. यासह स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यासह उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे असावे. याशिवाय सरकारनुसार आरक्षित प्रवर्गासाठी वयाची सवलत देण्यात येणार आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी वयाची कोणतीही सवलत असणार नाही. या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.