esakal | एनटीएने NCHM JEE 2021 परीक्षा नोंदणीची तारीख वाढविली ! सुधारित वेळापत्रक तपासा
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel Management

एनटीएने NCHM JEE 2021 परीक्षा नोंदणीची तारीख वाढविली ! सुधारित वेळापत्रक तपासा

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : हॉटेल व्यवस्थापन संयुक्त प्रवेश परीक्षा (National Council for Hotel Management Joint Entrance Examination) नोंदणीची तारीख वाढविण्यात आली आहे. परीक्षा घेणारी एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (National Testing Agency, NTA) एनसीएचएम जेईई 2021 परीक्षा फॉर्म भरण्यासाठी अंतिम मुदत वाढविली आहे. त्यानुसार आता उमेदवार 31 मे 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. (NTA extends NCHM JEE 2021 exam registration date)

या प्रवेश परीक्षेला बसू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट nchmjee.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त, एनटीएने 12 जून 2021 रोजी प्रस्तावित नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट संयुक्त प्रवेश परीक्षा स्थगित केली आहे. यासंदर्भात एनटीएने अधिकृत अधिसूचना जारी केली, की कोव्हिड-19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे अर्ज भरण्याच्या तारखांची मुदत वाढविण्यात येत आहे. त्याचबरोबर लवकरच परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा केली जाईल.

एनसीएचएम जेईई 2021 : या तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 31 मे 2021

  • परीक्षा शुल्क ऑनलाइन देयक अंतिम तारीख : 31 मे 2021

  • करेक्‍शन विंडो ओपन होण्याची तारीख : 2 जून ते 8 जून 2021 पर्यंत

हेही वाचा: NIT ने मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन कॉमन एन्ट्रन्स टेस्ट पुढे ढकलली ! जाणून घ्या अपडेट

असा भरा परीक्षा फॉर्म ऑनलाइन

एनसीएचएम जेईई 2021 परीक्षा फॉर्म भरण्यासाठी प्रथम nchmjee.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर NCHM JEE 2021 रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्‍लिक करा. यानंतर सूचना बुलेटिन डाउनलोड करा आणि आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करा. ऑनलाइन अर्ज फी भरा. यानंतर ऑनलाइन एनसीएचएम जेईई अर्ज भरा. फॉर्मचे प्रिंटआउट घ्या आणि भविष्यासाठी ठेवा.

एनटीएमार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत बीएस्सी हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ऍडमिनिस्ट्रेशनच्या अभ्यासक्रमांना शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा शुल्क देखील 1000 रुपये द्यावे लागेल. तीन तासांच्या प्रवेश परीक्षेत 200 बहुविकल्पीय प्रश्न विचारले जातील. परीक्षेशी संबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि nchmjee.nta.nic.in वर भेट द्यावी लागेल.