esakal | विविध पदांसाठी होतेय "इस्रो'मध्ये भरती ! "या' तारखेपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

ISRO

विविध पदांसाठी होतेय "इस्रो'मध्ये भरती ! "या' तारखेपर्यंत करा अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (Indian Space Research Organisation - ISRO) विविध पदांवर नियुक्ती होणार आहे. त्यानुसार ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, अकाउंट्‌स ऑफिसर, पर्चेस अँड व स्टोअर ऑफिसर या पदांवर भरती होणार आहे. त्याअंतर्गत एकूण 24 पदांसाठी नेमणुका होतील. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अशा परिस्थितीत इच्छुक उमेदवारांनी 21 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने त्वरित अर्ज करावा.

"इस्रो'ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 24 पदांसाठी नेमणुका घेण्यात येतील. ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया 1 एप्रिल 2021 रोजी सुरू झाली आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2021 आहे. यासह फी जमा करण्याचीही हीच शेवटची तारीख आहे. त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना इस्रोच्या अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अधिसूचनेनुसार पर्चेस व स्टोअर ऑफिसरच्या 12, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर 06 आणि अकाउंट्‌स ऑफिसर पदासाठी 06 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.

या तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाइन अर्ज सबमिशनला प्रारंभ : 1 एप्रिल 2021

  • ऑनलाइन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख : 21 एप्रिल 2021

  • फी भरण्याची शेवटची तारीख : 23 एप्रिल 2021

शैक्षणिक पात्रता

इस्रोने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अकाउंट्‌स ऑफिसर यासह इतर पदांवर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. त्यानुसार अकाउंट्‌स ऑफिसर पदावर ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून एसीए / एफसीए किंवा एआयसीडब्ल्यूए / एफआयसीडब्ल्यूए किंवा एमबीए किंवा एमकॉममध्ये एक वर्षाचा अनुभव असावा. तसेच बीकॉम / बीबीए / बीबीएम (पर्यवेक्षी क्षमतेत दोन वर्षे) देखील असावा.

ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी ऑनलाइन अर्ज करणारे उमेदवार एमबीए यासह सुपरवायझर पदावर एक वर्षाचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (3 वर्षे पर्यवेक्षकीय क्षमतेचा अनुभव) किंवा पाच वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर (पर्यवेक्षक क्षमता 2 वर्षे) असावेत. भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक तपशिलासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.