ATMA 2021 सेशनसाठी फी जमा करण्याची उद्या शेवटची तारीख ! त्वरा करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ATMA

ATMA 2021 सेशनसाठी फी जमा करण्याची उद्या शेवटची तारीख !

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (Association of Indian Management Schools : AIMS) ने मे सत्रासाठी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ऍडमिशन (ATMA 2021) ची अर्ज प्रक्रिया 26 एप्रिल 2021 पासून सुरू केली. ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख 23 मे 2021 आहे. तथापि, फी भरण्याची शेवटची तारीख 22 मे आहे. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आता विनाविलंब अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट atmaaims.com वर भेट द्यावी. (Saturday is the last date to deposit fees for ATMA 2021 session)

हेही वाचा: सर्वच विद्यार्थ्यांची जून ते ऑगस्टमध्ये परीक्षा !

ऑनलाइन नोंदणीची लिंक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रतेचे निकष नीट तपासले पाहिजेत. ATMA 2021 मे सत्रासाठी 30 मे 2021 रोजी परीक्षा होणार आहे. होम बेस्ड ऑनलाइन मोडमध्ये दुपारी 2 ते 5 या वेळेत एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: यूपीएससी एनडीए (2) परीक्षेची अधिसूचना होणार "या' दिवशी प्रसिद्ध !

या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा

  • फी भरण्याची शेवटची तारीख : 22 मे 2021

  • ऑनलाइन नोंदणीसाठी अंतिम तारीख : 23 मे 2021

  • अर्जाची प्रिंट काढण्याची अंतिम तारीख : 25 मे 2021

  • प्रवेशपत्र जारी होण्याची तारीख : 26 मे 2021

  • परीक्षेची तारीख : 30 मे 2021

  • निकाल जाहीर : 5 जून 2021

असा करा ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आधी अधिकृत वेबसाइट atmaaims.com वर जा. यानंतर नोंदणी करण्यासाठी मेन पेजवरील उपलब्ध महत्त्वाच्या तारखा विभागातील क्‍लिक हियर टू रजिस्टर फॉर ATMA Exam लिंकला क्‍लिक करा. आता एक नवीन टॅब उघडेल. येथे मागविलेले तपशील जसे की नाव, जन्म तारीख, शहर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाका आणि फी भरा. आता आपल्याला वैयक्तिक ओळख क्रमांक (पीआयडी) मिळेल. यानंतर आपण पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सूचना तपासल्या पाहिजेत.

loading image
go to top