‘लक्ष्य’भेद : करिअर आणि व्यक्तिमत्त्व

पर्सोनॅलिटी हा शब्द लॅटिन परर्सोनामधून आलेला आहे. व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल यापूर्वी आपण खूप चर्चा ऐकली नसेल.
Career and Personality
Career and Personalitysakal

- सोनल सोनकवडे

पर्सोनॅलिटी हा शब्द लॅटिन परर्सोनामधून आलेला आहे. व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल यापूर्वी आपण खूप चर्चा ऐकली नसेल. परंतु आजच्या स्पर्धात्मक काळात व्यक्तिमत्त्व विकास हा व्यक्तीच्या सर्वांगिण विकासासाठी अविभाज्य घटक आहे. आपण बुद्धीच्या पातळीवर काय विचार करतो, आपण मनाच्या पातळीवर कसा अनुभव करतो आणि इतरांशी कसे वागतो या त्रिकूटाच्या समीकरणातून आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे, ते निश्चित होत जाते.

आपण सकारात्मक विचार करतो का, आपल्या वागण्या-बोलण्यात दयाभाव आहे का, आपल्या वर्तनातून नेतृत्वगुण दिसतात का, आपण शांत, संयमी आहोत का, आपल्या मनात प्रेमाची भावना, राग, द्वेषाच्या भावनेपेक्षा जास्त स्थिर राहते का या सर्व निकषांवर आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे, ते ठरते.

व्यक्तिमत्त्व हे बाह्य आणि अंतर्गत अशा स्वरूपात असते. बाह्य व्यक्तिमत्त्वात आपण दिसतो कसे, व्यवस्थित राहतो का, केस विंचरलेले आहेत का, कपडे व्यवस्थित घातले आहेत का, नखे कापली आहेत का आदी सर्व गोष्टींचा अंतर्भाव होत असतो. अंतर्गत व्यक्तिमत्त्वात मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवर घडणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो.

अर्थात आपण शांत, संयमी आहोत का, की कायम चिडचिड करत असतो, आपण दूरदृष्टी ठेवून सर्वसमावेशक निर्णय घेतो का, की केवळ स्वतःपुरता विचार करतो हे मनाचा विचारावे. आपण इतरांचे म्हणणे ऐकतो की स्वतःचेच खरे करतो, दुसऱ्याशी संवाद साधताना आपले म्हणणे योग्य पद्धतीने त्याच्यापर्यंत पोचवू शकतो का, याचा साकल्याने विचार करावा. एखाद्याचे म्हणणे न पटल्यास कशा पद्धतीने व्यक्त होतो या सर्व गोष्टींमधून आपले अंतर्गत व्यक्तिमत्त्व प्रकट होत असते.

आपल्या व्यक्तिमत्त्वात वंश परंपरेने आलेल्या काही गोष्टी निश्चित असतात. समाजात आपण कसे मिसळतो, आपले वागणे-बोलणे आणि अनुभव यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. वंश परंपरेने आलेल्या गोष्टी बाह्य व्यक्तिमत्त्वावर परिमाण करत असतात. तर दुसऱ्या बाजूला आपले अनुभव, कोणत्या परिस्थितीत आपली वाढ झालेली असते याचा अंतर्गत व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव असतो.

व्यक्तिमत्त्व विकास केवळ करिअरच्या दृष्टिने उपयुक्त असे नाहीतर त्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्व आहे. कौटुंबिक समस्या सोडवायच्या असोत, आपल्याला आवडणाऱ्या मुलीला मागणी घालायची असेल, प्रत्येक ठिकाणी आपले व्यक्तिमत्त्व महत्त्वाची भूमिका बजावत असतो. काही विद्यापीठांतून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. परंतु कोणताही प्रशिक्षण वर्ग न लावता व्यक्तिमत्त्व विकास कसा साधायचा याचे धडे पुढील काही भागांतून देणार आहे.

(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी, गीतकार, गायिका आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com