‘लक्ष्य’भेद : संवादाचं कौशल्य...

अंतर्गत व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्ही काय विचार करता आणि तो व्यक्त कसा करता, हे होय. व्यक्त होणं आणि अचूक मांडणी करणं हा व्यक्तिमत्त्व विकासाचा खूप महत्त्वाचा भाग आहे.
Communication skill
Communication skillsakal

- सोनल सोनकवडे

अंतर्गत व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्ही काय विचार करता आणि तो व्यक्त कसा करता, हे होय. व्यक्त होणं आणि अचूक मांडणी करणं हा व्यक्तिमत्त्व विकासाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. अनेक प्रकाराने आपण व्यक्त होऊ शकतो. कधीकधी न बोलता, कधीतरी खूप बोलून, लिहून.

या माध्यमातून आपण आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. यालाच संवादाचं कौशल्य म्हणतात. संवाद कौशल्य म्हणजे केवळ भारदस्त शब्द वापरून परिमाणकारक बोलणं असं नाही. तर कधी, किती बोलायचं, कधी शांत राहायचं या सर्व गोष्टीचं तारतम्य बाळगणं अपेक्षित असतं.

एखाद्याशी मौन धरूनही आपण राग व्यक्त करू शकतो आणि त्याच्याबद्दल अपशब्द उच्चारूनसुद्धा. समोरच्या व्यक्तीवर कशाचा परिणाम होईल, याचा अंदाज घेऊन कशा पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायची हे ठरवायचं असतं. त्यालाच संवादकौशल्य म्हणतात.

गर्दीसमोर किंवा ग्रुप डिक्सशनमध्ये परिणामकारक बोलणं हा संवाद कौशल्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जमवायचं असल्यास संधी मिळेल तेव्हा वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा. ग्रुपमध्ये व्हायची किंवा गर्दीसमोर बोलायची भीती सरावानं कमी होऊ शकते. त्यासाठी कोणतीही संधी डावलायची नाही.

भाषेवर प्रभुत्व असणं हेही संवाद कौशल्याचं महत्त्वाचं अंग आहे. यासाठी सातत्यानं प्रयत्न हाच एक भाग आहे. या प्रयत्नासाठी शॉर्टकट नाही. मी स्वतः मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर महाविद्यालयात गेल्यावर कॉन्व्हेंटमध्ये शिकून आलेल्या मुलांशी इंग्रजीत बोलता येत नाही, याची लाज वाटायची. त्यासाठी वर्षभर केवळ इंग्रजी वर्तमानपत्रे आणि मासिकांचे वाचन केले.

भाषेवरील अधिकाधिक प्रभुत्वाबरोबर सरावही तितकाच आवश्यक आहे. बोलण्याची पद्धत महत्त्वाची. त्यातून आत्मविश्वास वाढतो. मात्र, आज असं जाणवतं की संवाद कौशल्यात आणखी एक महत्त्वाचं कौशल्य म्हणजे ऐकण्याची कला. लक्षपूर्वक ऐकणाराच उत्तम संवाद साधू शकतो. समोरचा काय बोलतोय, हे लक्षात घेणं महत्त्वाचं असतं.

समोरच्याचं आपण लक्षपूर्वक ऐकत आहोत, हे देहबोलीतून लक्षात आणून देणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीचं संवादकौशल्य त्याचे भाषेवरील प्रभुत्व, किती क्लिष्ट शब्द वापरतो, कोणत्या पद्धतीनं बोलत आहे, यावर अवलंबून नसतं, तर किती परिणाम झाला यावर असतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com