‘लक्ष्य’भेद : गटचर्चा आणि वैचारिक स्पष्टता

विचारांची स्पष्टता आणि आपली स्वतंत्र पद्धत विकसित होण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुमच्या सोबत अभ्यास करणाऱ्या मुला-मुलींबरोबर किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर विविध गोष्टींवर चर्चा करणे.
Group Discussion
Group DiscussionSakal
Summary

विचारांची स्पष्टता आणि आपली स्वतंत्र पद्धत विकसित होण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुमच्या सोबत अभ्यास करणाऱ्या मुला-मुलींबरोबर किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर विविध गोष्टींवर चर्चा करणे.

- सोनल सोनकवडे

विचारांची स्पष्टता आणि आपली स्वतंत्र पद्धत विकसित होण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुमच्या सोबत अभ्यास करणाऱ्या मुला-मुलींबरोबर किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर विविध गोष्टींवर चर्चा करणे. खरेतर ज्या पालकांना आपल्या पाल्याने स्पर्धा परीक्षा द्याव्यात असे वाटते त्यांनी या आपल्या मुलांमध्ये शालेय वयापासून अशा गटांमधून चर्चा करण्याची सवय बिंबवली पाहिजे. अशा चर्चांमधून काही वेळा तुम्हाला अभ्यासासाठीच्या एखाद्या नव्या पुस्तकाची माहिती मिळते किंवा एखाद्या प्रश्नाची नवी बाजू लक्षात येते.

गटचर्चेमध्ये लक्षात आलेल्या किंवा माहिती मिळालेल्या गोष्टींचा मुलाखतीसाठी तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. तुम्ही अनभिज्ञ असलेल्या एखाद्या विषयाबद्दल विचार कसा करावा याची दिशा तुम्हाला मिळते. गटचर्चेचा अजून एक फायदा म्हणजे आपण जी परीक्षा देत आहोत त्याच परीक्षेसाठी आणि त्याच प्रकारचा अभ्यास करणारी व्यक्ती कसा विचार करते आणि तिचा किंवा त्याचा विचार कसा वेगळा आहे हे तुमच्या लक्षात येते आणि बऱ्याचदा याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

अशा पद्धतीच्या चर्चा करण्यासाठी पाळण्याचे पथ्य म्हणजे केवळ मजेसाठी किंवा लक्ष विचलित करण्यासाठी कुणी या गटामध्ये सहभागी होणार असल्यास अशा गटामध्ये जाणे टाळावे अथवा अशा व्यक्तीला तुमच्या गटापासून दूर ठेवावे. तुमच्यापेक्षा अधिक काळ अभ्यास करणारा किंवा जास्त प्रयत्न दिलेला कुणी चांगला अनुभवी असेल, तर त्याच्याशी मैत्री करावी. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी किंवा मुलाखतीच्या वेळी आपण काय विचार केला पाहिजे याचे मार्गदर्शन अशी एखादी अनुभवी व्यक्ती करू शकते.

तुमच्याबद्दल तुमचे काही ठराविक आडाखे असणे, तुमची स्वतंत्र भूमिका, मते आणि कारणे असण्याचा फायदा हा विविधांगी असतो पण तुम्ही स्वत:हून विचार करायला सुरुवात केल्याशिवाय त्याचा उपयोग आणि फायदा हे दोन्ही लक्षात येणार नाही, त्यामुळे मी जे म्हणते आहे त्यावरही विचार करा आणि या सगळ्याबद्दल तुमचे एक मत तयार करा आणि माझ्यापर्यंत ते पोहोचवलेत तर ते मला विशेष आवडेल.

(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी, गायिका आणि गीतकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com