दक्षिण मध्य रेल्वेमध्ये 4103 अप्रेंटिस पदांची जम्बो भरती!

दक्षिण मध्य रेल्वेमध्ये 4103 अप्रेंटिस पदांची जम्बो भरती! दहावी व आयटीआय उत्तीर्णांना संधी
दक्षिण मध्य रेल्वे
दक्षिण मध्य रेल्वेGallery
Summary

या भरती अंतर्गत इलेक्‍ट्रिशियन, एसी मेकॅनिक, सुतार, डिझेल मेकॅनिक आणि इतर ट्रेड्‌सची एकूण 4103 रिक्त पदे विविध युनिटमध्ये भरली जाणार आहेत.

सोलापूर : दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway - SCR) तर्फे 1 ऑक्‍टोबर रोजी प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी (Recruitment) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 4 ऑक्‍टोबरपासून सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 आहे. या भरती अंतर्गत इलेक्‍ट्रिशियन, एसी मेकॅनिक, सुतार, डिझेल मेकॅनिक आणि इतर ट्रेड्‌सची एकूण 4103 रिक्त पदे विविध युनिटमध्ये भरली जाणार आहेत.

दक्षिण मध्य रेल्वे
90 मिनिटांच्या ऑफलाइन मोडमध्ये होतील CBSE टर्म-1 च्या परीक्षा!

अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. यासाठी scr.indianrailways.gov.in वर लॉग इन करावे लागेल. तपशीलवार अधिसूचनेसह अर्ज करा. ऑनलाइन लिंक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्याच वेळी, श्रेणीनुसार रिक्त पदांचा तपशील देखील अधिसूचनेमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

फिटर पदासाठी जास्तीत जास्त रिक्त पदे काढण्यात आली आहेत, ज्यात एकूण 1460 पदांचा समावेश आहे. यानंतर सर्वाधिक रिक्त जागा इलेक्‍ट्रिशियनची आहेत. या ट्रेडमध्ये एकूण 1019 पदे भरली जाणार आहेत. उमेदवार वेबसाइटवर भेट देऊन अधिसूचनेद्वारे रिक्त जागांचा तपशील तपासू शकतात.

दक्षिण मध्य रेल्वे
नौदलात नाविक भरतीसाठी अधिसूचना जारी! दहावी उत्तीर्णांसाठी संधी

हे उमेदवार करू शकतात अर्ज

या भरतीसाठी अर्ज करण्यास हे उमेदवार पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डाकडून किमान 50 टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याचवेळी, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. याव्यतिरिक्त 4 ऑक्‍टोबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 15 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलतेची तरतूद आहे. तपशीलवार माहितीसाठी सूचना तपासू शकता.

अशी होईल निवड

दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून उमेदवारांची निवड केली जाईल. निवड प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपशीलवार सूचना तपासू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com