esakal | Jobs : नौदलात नाविक भरतीसाठी अधिसूचना जारी! दहावी उत्तीर्णांसाठी संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Navy
नौदलात नाविक भरतीसाठी अधिसूचना जारी! दहावी उत्तीर्णांसाठी संधी

नौदलात नाविक भरतीसाठी अधिसूचना जारी! दहावी उत्तीर्णांसाठी संधी

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : मॅट्रिक (दहावी) पास उमेदवारांसाठी भारतीय नौदलाने (Indian Navy) एप्रिल 2022 मध्ये सुरू होणाऱ्या तुकडीसाठी नाविक म्हणून मॅट्रिक भरती (MR) करिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नेव्ही एमआर एप्रिल 2022 जाहिरातीनुसार 300 रिक्त जागांवर पदे भरावयाची आहेत. या रिक्त पदांसाठी अर्जाच्या तपशिलांवर आधारित निवड प्रक्रियेचा भाग म्हणून सुमारे 1500 उमेदवारांना लेखी चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीएफटी) साठी बोलावले जाईल. तसेच, लेखी परीक्षेला बसण्यासाठी कट-ऑफ निर्धारित केले जाऊ शकते, ते प्रत्येक राज्यात भिन्न असू शकते.

हेही वाचा: भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केली अप्रेंटिसशिप पदांची भरती!

अशी असेल अर्ज प्रक्रिया

भारतीय नौदलात मॅट्रिक भरती 2021-22 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना नेव्ही भरती पोर्टल joinindiannavy.gov.in वरील ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 29 ऑक्‍टोबरपासून सुरू होईल आणि उमेदवार 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून नेव्ही एमआर भरती 2021 अधिसूचना डाउनलोड करावी आणि काळजीपूर्वक वाचावी.

नेव्ही एमआर भरतीसाठी पात्रता

भारतीय नौदलाने एप्रिल 2022 बॅचसाठी जारी केलेल्या एमआर अधिसूचना 2021 नुसार अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक अर्थात दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांचा जन्म 1 एप्रिल 2002 पूर्वीचा आणि 31 मार्च 2005 नंतरचा नसावा.

हेही वाचा: ONGC मध्ये निघाली ग्रॅज्युएट ट्रेनी भरती! 1 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

अशी असेल निवड प्रक्रिया

MR च्या एकूण 300 रिक्त पदांसाठी अर्जाच्या आधारावर सुमारे 1500 उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. परीक्षेमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि परीक्षेचा कालावधी 30 मिनिटांचा असेल. हे प्रश्न गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयातून विचारले जातील. प्रश्नांची पातळी दहावीची असेल. उमेदवार नेव्ही भरती पोर्टलवरून अभ्यासक्रम डाउनलोड करू शकतात.

loading image
go to top