esakal | महत्त्वाची बातमी : SET परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

SET exam

१८ ते २५ जून या कालावधीतही विद्यार्थ्यांना ५०० रुपये विलंब शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहेत.

महत्त्वाची बातमी : SET परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करता अनेक उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळावी, यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी १७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात २६ सप्टेंबर २०२१ रोजी राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) अर्ज भरण्याची मुदत १० जून ऐवजी आता १७ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. (Extension for filling up SET exam applications)

दरम्यान १८ ते २५ जून या कालावधीतही विद्यार्थ्यांना ५०० रुपये विलंब शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्यासाठी सेट विभागाकडून २६ ते ३० जून दरम्यान संधी दिली आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेट विभागाचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

हेही वाचा: संधी नोकरीच्या... : ॲडव्हान्स डिझाईनमधील यूआय, यूएक्स

MHT-CET परीक्षा नोंदणीला सुरुवात

दुसरीकडे, बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि बी. एस्सी (कृषी) या पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी- सीईटी परीक्षा (MHT-CET) घेतली जाते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. इच्‍छुक विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईल.

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यासंदर्भात सविस्‍तर सूचनापत्र जारी केले आहे. कोरोना महामारीमुळे बारावीच्‍या परीक्षा रद्द केल्‍यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये पुढील प्रक्रियेबाबत अस्‍वस्‍थता वाढली होती. प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सीईटी सेलने मंगळवारी (ता.८) रात्री उशिरा सूचनापत्र जारी करत महत्त्वाच्या तारखांची घोषणा केली आहे. पात्रतेच्‍या अटी- शर्तींसह सविस्‍तर सूचनापत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

जॉब-एज्युकेशनसंबंधी आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.