SSC result : पुणे विभागीय मंडळात सोलापूर अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळात दोन लाख ६६ हजार ४०० नियमित विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली.
Maharashtra-SSC-Result
Maharashtra-SSC-Resultsakal
Summary

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळात दोन लाख ६६ हजार ४०० नियमित विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली.

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळात दोन लाख ६६ हजार ४०० नियमित विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ९६.९६ टक्के विद्यार्थी म्हणजेच दोन लाख ५८ हजार ३१२ विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले. विभागीय मंडळात सोलापूर जिल्हा अव्वल ठरला असून या जिल्ह्यातील ९७.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर पुणे जिल्ह्यातील ९६.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेस नऊ हजार ४२० पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नऊ हजार ११० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी सात हजार ३०५ विद्यार्थी (८०.१८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती विभागीय अध्यक्ष वंदना वाहूळ यांनी दिली. पुणे विभागातील पाच विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. २०२०च्या तुलनेत (९७.३४ टक्के) पुणे विभागीय मंडळाचा यंदा निकाल ०.३८ टक्क्यांनी घटला आहे.

जिल्हानिहाय निकालाची टक्केवारी :

जिल्हा : परीक्षा दिलेले विद्यार्थी : उत्तीर्ण विद्यार्थी : उत्तीर्णतेची टक्केवारी

  • पुणे : १,३२,८४७ : १,२८,५६७ : ९६.७७ टक्के

  • नगर : ६८,९०१ : ६६,५४९ : ९६.५८ टक्के

  • सोलापूर : ६४,६५२ : ६३,१९६ : ९७.७४ टक्के

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय उत्तीर्णतेची टक्केवारी :

तालुका : टक्केवारी

  • आंबेगाव : ९८.२८ टक्के

  • बारामती : ९७.७१ टक्के

  • भोर : ९९.४४ टक्के

  • दौंड : ९६.७८ टक्के

  • हवेली :९५.१२

  • इंदापूर : ९७.४९

  • जुन्नर : ९७.५४

  • खेड : ९६.३३

  • मावळ : ९७.६४

  • मुळशी : ९६.२२

  • पुणे शहर (पश्चिम) : ९६.२४

  • पुरंदर : ९९.०५

  • शिरूर : ९६.७५

  • वेल्हा : ९७.२९

  • पुणे शहर (पूर्व) :९६.१२

  • पिंपरी-चिंचवड : ९७.७३

टक्केवारीनिहाय विद्यार्थी संख्या :

  • १०० टक्के : ०५

  • ९० टक्के आणि त्यापुढे : १३,१३३

  • ८५ टक्के ते ९० टक्के : २४,९७८

  • ८० टक्के ते ८५ टक्के : ३४,०४३

  • ७५ टक्के ते ८० टक्के : ३७,३१२

  • ७० टक्के ते ७५ टक्के : ३५,८८०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com