esakal | SBI Clerk Prelims Admit Card : पीईटीसाठी 26 मे तर प्रिलिम्ससाठी 1 जूनपासून करा डाउनलोड
sakal

बोलून बातमी शोधा

SBI

एसबीआय लिपिक प्रिलिम्स 2021 ची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु असा विश्वास आहे की जून 2021 महिन्यात ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.

SBI Clerk Admit Card : पीईटीसाठी 26 मे, प्रिलिम्ससाठी 1 जूनपासून करा डाउनलोड

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : भारतीय स्टेट बॅंक (SBI) मधील लिपिक (Clerk) संवर्गातील कनिष्ठ असोसिएट्‌सच्या (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) 5000 हून अधिक पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 मे 2021 रोजी संपली आहे. लिपिक पदांवर भरतीसाठी स्टेट बॅंकेने ठरविलेल्या निवड प्रक्रियेनुसार प्रथम प्राथमिक परीक्षा घ्यावी लागते. एसबीआय लिपिक प्रिलिम्स 2021 (sbi clerk prelims admit card 2021) ची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु असा विश्वास आहे की जून 2021 महिन्यात ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. त्याचबरोबर प्राथमिक परीक्षेचे स्वरूप व कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी परीक्षापूर्व प्रशिक्षण (पीईटी) घेण्यात येणार आहे. एसबीआय लिपिक पीईटी 2021 (sbi clerk admit card 2021) मध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांची प्रवेशपत्रे बुधवार (26 मे 2021) पासून डाउनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच 1 जून 2021 पासून एसबीआय लिपिक प्रिलिम्स ऍडमिट कार्ड 2021 (sbi clerk prelims 2021) डाउनलोड करण्यासाठी बॅंकेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. (State Bank of India to release prelims exam admit cards at sbi.co.in from may 26 and june 1)

हेही वाचा: पुढील दोन वर्षांत टेलिकॉम क्षेत्रात होणार बंपर भरती !

कोण घेऊ शकेल एसबीआय लिपिक परीक्षापूर्व प्रशिक्षण?

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने जारी केलेल्या एसबीआय लिपिक भरती 2021 च्या अधिसूचनेनुसार, अनुसूचित जाती, जमाती, माजी सैनिक, धार्मिक अल्पसंख्याकांसाठी असलेल्या उमेदवारांसाठी बॅंक विविध शहरांमध्ये अनुसूचित परीक्षा केंद्रे घेईल. या समाजातील उमेदवार ज्यांनी अर्जाच्या वेळी पीईटीची निवड केली आहे ते एसबीआय लिपिक पीईटी 2021 प्रवेशपत्र निश्‍चित तारखेपर्यंत एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकतील. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड / जन्मतारीख भरावी लागेल. त्याच वेळी उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की त्यांना स्वखर्चाने एसबीआय लिपिक पीईटी 2021 मध्ये सामील व्हायचे आहे. एसबीआय लिपिक पीईटी 2021 कॉल लेटरची हार्ड कॉपी त्यांना पाठविली जाणार नाही.

हेही वाचा: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळात नोकरीची संधी !

पीईटी ऑफलाइन की ऑनलाइन?

एसबीआय लिपिक भरती 2021 च्या अधिसूचनेनुसार, कोरोना (कोव्हिड-19) विषाणूच्या देशभरातील प्रादुर्भावामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसबीआयद्वारे ऑफलाइन किंवा ऑनलाइनद्वारे पीईटीचे आयोजन करण्यात येणार आहे.