राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात सहभागी न झालेल्या शाळांना बजावल्या जाणार नोटिसा | National Achievement Survey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात सहभागी न झालेल्या शाळांना बजावल्या जाणार नोटिसा

मुंबई : राज्यातील शाळा आणि त्यातील विद्यार्थी व शिक्षकांचे मूल्यमापन (students and teachers evaluation) करण्यासाठी काल आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement survey) मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सामील (school participation) झाल्या होत्या. परंतु काही अनुदानित शाळांनी (granted school) यात सहभाग घेतला नाही, अशा शाळांवर शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच नोटिसा (Notice) बजावल्या जाणार आहेत.

हेही वाचा: मुंबईत १७ हजार बोगस डॉक्टर्स ? बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामध्ये निवड केलेल्या प्रत्येक शाळांनी सहभागी व्हावे, व त्या दिवशी कोणतीही सुट्टी घेतली जाऊ नये, असे सक्तीचे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. परंतु लातूर, नागपूर, नांदेड आदी जिल्ह्यातील काही शाळांनी आपला सहभाग नोंदविला नसल्याने त्या शाळांची माहिती घेऊन त्यांना नोटिसा बजावल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी राज्यभरातून 7330 शाळा आणि त्यातील 2 लाख 34 हजार 55 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यात 99 टक्के शाळा या सहभागी झाल्या होत्या. तर विद्यार्थी हे 92 ते 97 टक्के इतके उपस्थित होते. यात ज्या शाळांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदविला नाही त्यामधे औरंगाबाद, गडचिरोली, जळगाव, पुणे या जिल्ह्यातील प्रत्येकी एक शाळांचा समावेश आहे तर त्यानंतर पुणे, नागपूर, नांदेड या जिल्ह्यातील सर्वाधिक शाळा असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

loading image
go to top