मुंबईत १७ हजार बोगस डॉक्टर्स ? बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले | Mumbai Fake Doctors | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fake doctor

मुंबईत १७ हजार बोगस डॉक्टर्स ? बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical certificate) नसताना वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका बोगस आयुर्वेदिक डॉक्टरला (fake doctor) धारावी पोलिसांनी (Dharavi police) नुकतीच अटक (culprit arrested) केली. अयान जुदस्टीर रॉय असे या ३५ वर्षांच्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याच्यावर भादंवी कलम ४१९, ४२०, ३३६ तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३, ३३(अ) आणि ३६ नुसार गुन्हा दाखल (Police FIR) करण्यात आला आहे.

हेही वाचा: "कंगना कसली झाशीची राणी, ती तर पत्त्यांच्या कॅटमधली राणी"

रोडवर तो आयुर्वेदिक उपचार केंद्र नावाने त्याचे क्लिनीक चालवत होता. पोलिसांनी एका बनावट रुग्णाला पाठवून सापळा रचला. बनावट रुग्णाला डायबेटीसचा त्रास आहे, असे सांगून त्याच्याकडून औषध घेतले. त्यासाठी त्या बनावट डॉक्टरने रुग्णाकडून ५०० रुपये फी घेतली. त्याच वेळी पोलिसांनी छापा टाकून बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले. तपासणीदरम्यान बोगस डॉक्टरकडे व्यवसाय करण्यासाठी लागणारे मेडिकल काऊंसिलचे कोणतेही प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला.

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

धारावीत गेल्या वर्षीही दोन बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. वडाळ्यातही दोन जणांना अटक करण्यात आली होती. एका खासगी सर्व्हेनुसार धारावी, वडाळा, मानखुर्दसोबतच मुंबईभर जवळपास १७ हजार बोगस डॉक्टर व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली आहे. या डॉक्टरांना पुरेसे वैद्यकीय ज्ञान नसल्याने अनेकदा रुग्णांच्या जिवावर बेतल्याचे प्रकारही घडले आहेत.

loading image
go to top