CET परीक्षांची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा; प्रवेश प्रक्रिया लांबण्याची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Education News Opportunity to improve your CET application pune

CET परीक्षांची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा; प्रवेश प्रक्रिया लांबण्याची भीती

नाशिक : विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली असताना आता विद्यार्थ्यांना या सीईटी परीक्षांची प्रतीक्षा लागली आहे. ऑगस्‍टमध्ये या परीक्षा होणार असल्‍याने यानंतर प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल. यामुळे प्रवेशप्रक्रिया लांबण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे. (CET exam upadates)

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत. बारावीनंतर व पदवीनंतरच्‍या विविध पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे. सीईटी परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविल्‍यानंतर अन्‍य सर्व प्रक्रिया यापूर्वीच पार पाडण्यात आलेली आहे. यापूर्वी सीईटी सेलने जाहीर केलेल्‍या सीईटी परीक्षांच्‍या तारखांमध्ये मध्यंतरी बदल करण्यात आला होता. त्‍यानुसार आता या सीईटी परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र व बी. एस्सी (कृषी) या शिक्षणक्रमांसाठी होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेला प्रविष्ट होणारे बहुतांश विद्यार्थी नीट, जेईई मेन्‍स या परीक्षांनादेखील सामोरे जात असतात. त्यामुळे या ही सीईटी परीक्षा विलंबाने घेतल्‍याने विद्यार्थ्यांची सुविधाच होणार आहे. परंतु अन्‍य शिक्षणक्रमांची सीईटी विलंबाने ठेवल्‍याने त्‍याची सुविधा कमी व विद्यार्थ्यांना फटकाच जास्‍त बसणार असल्‍याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: MPSC: प्रवेशपत्रात गोंधळ, आयोगाकडून कार्यवाही तूर्तास स्थगित

अशा आहेत प्रमुख शिक्षणक्रमांच्‍या

सीईटी परीक्षांच्‍या संभाव्‍य तारखा-

एमएचटी-सीईटी----------------५ ते २० ऑगस्‍ट

(पीसीएम, पीसीबी ग्रुप)

एमबीए-------------------------२३ ते २५ ऑगस्‍ट

एलएलबी (३ वर्षे)------------३ व ४ ऑगस्‍ट

एलएलबी (५ वर्षे)----------२ ऑगस्‍ट

हेही वाचा: अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी तब्बल पावणे चार लाख जागा उपलब्ध

Web Title: Students Await Cet Exam Latest Education Upadates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..