दहावी पास विद्यार्थीही आता सीए फाऊंडेशनसाठी करु शकणार नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

याआधी बारावीची परिक्षा पास झालेलेच विद्यार्थी या कोर्ससाठी नोंदणी करण्यास पात्र होते.

चेन्नई : इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ट्ड आकाऊंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) आता एक नवीन निर्णया जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सीएची परिक्षा ही अवघड मानली जाते. ही परिक्षा तीन टप्प्यात होत असते. ती पार करुन सीए बनण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पाहत असतात. वर्षानुवर्षे यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता या नव्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. नव्या निर्णयानुसार आता दहावी पास विद्यार्थी देखील सीएच्या पहिल्या एंट्री लेव्हलच्या परिक्षेसाठी नोंदणी करु शकतात. सीएच्या फाऊंडेशन कोर्ससाठी ही एट्री लेव्हलची परिक्षा द्यावी लागते. 

हेही वाचा - खरंच स्वप्नातला जॉब; बिस्किट खायला वर्षाला मिळणार ४० लाख रुपये

याआधी बारावीची परिक्षा पास झालेलेच विद्यार्थी या कोर्ससाठी नोंदणी करण्यास पात्र होते. मात्र, आता आयसीएआयच्या या निर्णयानंतर सीएच्या कोर्ससाठी जाण्याची तयारी करणाऱ्या दहावी पास विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या संस्थेला अलिकडेच चार्टर्ड अकाऊंट विनियम, 1988 च्या अधिनियमानुसार 25 E, 25 F आणि 28F मध्ये संशोधनासाठी भारत सरकारची मंजूरी मिळाली आहे. सरकारच्या या मंजूरीनंतर, 10 वी पास विद्यार्थ्यांना आता ICAI च्या फाऊंडेशन कोर्समध्ये प्रोव्हीजनल रजिस्ट्रेशन करण्यासाठी संमती मिळाली आहे. मात्र, विद्यार्थ्याला बारावीची परिक्षा पास केल्यानंतरच फाऊंडेशन कोर्समधील प्रोव्हीजीनल ऍडमिशनला नियमित केले जाईल. 

हेही वाचा - सुप्रीम कोर्टमध्ये निघाली भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

 विद्यार्थी eservices.icai.org या वेबसाईटवर जाऊन लॉगईन करुन रजिस्ट्रेशन करु शकतात. फाऊंडेशन कोर्ससाठी मे/जून किंवा नोव्हेंबर/ डिसेंबरमध्ये आयोजित होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्याला जानेवारीच्या आधी संस्थेच्या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल. याचा अर्थ फाऊंडेशन परीक्षेमध्ये बसण्यासाठी आधी चार महिने अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी हा केंद्र सरकार अथवा राज्य  सरकारद्वारे मान्यता प्राप्त अशा सिनीयर सेंकडरी अर्थात बारावी परिक्षेमध्ये असणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, रजिस्ट्रेशनच्या फिमध्ये कसलाही बदल करण्यात आलेला नाहीये. अधिक माहीतीसाठी ऑफिशियल वेबसाईट जाऊन नवा निर्णय पाहता येईल.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students can register for ca after passing 10th exam