
मुंबई : एमएचटी सीईटी २०२५चे निकाल नुकतेच जाहीर झाले यात महाराष्ट्र बोर्डच्या ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पीसीएम विभागात ९८ पेक्षा जास्त पर्सेंटाइल गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये श्रेया संजय पांडे (९९.९९ पर्सेंटाइल), निर्भय दिलीप लाहोडे (९९.८१ पर्सेंटाइल) आणि सुकल्प राऊत (९९.६१ पर्सेंटाइल) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी 'पीडब्ल्यू महाराष्ट्र' या युट्यूब चॅनेलद्वारे तयारी केली होती.