Ravindra ChavanSakal
महाराष्ट्र बातम्या
Ravindra Chavan: भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब? उद्या होणार घोषणा
Ravindra Chavan: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविंद्र चव्हाण यांनी आपला अर्ज दाखल केला.
Ravindra Chavan: भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. उद्या संध्याकाळपर्यंत याची घोषणा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविंद्र चव्हाण यांनी आपला अर्ज केंद्रीय निरिक्षक किरेन रिजुजी यांच्याकडं दाखल केला. यावेळी भाजपच्या कार्यालयातून फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सूचकपणे रविंद्र चव्हाण यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं.

