विशेष : नर्सिंग वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम करिअर

सध्या नर्सिंगचे क्षेत्र देशासह जगभरात रोजगाराभिमुख बनले आहे.
Nurse
Nursesakal

- प्रा. सुभाष शहाणे

सध्या नर्सिंगचे क्षेत्र देशासह जगभरात रोजगाराभिमुख बनले आहे. नर्सिंग क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी नर्सिंग करिअरची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे-

नर्सिंगचे शिक्षण : (पदवी / पदविका / कोर्सेस) -

१) बी. एस. सी. (नर्सिंग) अवधी ४ वर्षे

२) एम.एस.सी. (नर्सिंग) पोस्ट ग्रॅज्युएट.

३) जी. एन. एम. (जनरल नर्सिंग व मिडवाइफरी) कालावधी ३ वर्षे.

४) ए.एन.एम. (ऑक्झिलरी नर्सिंग व मिडवाइफरी) कालावधी २ वर्षे.

वय व पात्रता - नर्सिंग पदवी प्रवेशासाठी वय १७ ते ३५ वर्षे आहे. किमान शिक्षण बारावी सायन्स (PCB)ची परीक्षा कमीत कमी ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी.

नर्सिंगच्या कोर्सचे शुल्क (आकडे रुपयांत)

१) बी.एस.सी. नर्सिंगसाठी ४० ते ७५ हजार

२) जी.एन.एम.साठी वार्षिक ५० ते ७५ हजार

३) ए.एन.एम.साठी २० ते ३० हजार

नर्सिंग शिक्षण, परीक्षा, कार्यप्रणाली, नियमावली इ. MSBNPE (Maharashtra State Board of Nursing and Paramedical Education) या मंडळाचे संपूर्ण नियंत्रण आहे.

नर्सिंग क्षेत्राच्या कामाची व्याप्ती -

नर्सिंगला विविध पदांवर काम करावे लागते तसेच अनुभवानुसार तशी नेमणूक होते. उदा. स्टाफ नर्स, वॉर्ड नर्स, आय.सी.यु नर्स, इएमएस नर्स, नर्सिंग सुपरवायझर, नर्सिंग ट्युटर, मेट्रन आदी.

नर्सिंग पदवी/पदविका अभ्यासक्रम - बी.एस. सी. नर्सिंग कोर्समध्ये प्रामुख्याने पुढील पाठ्यक्रम शिकवला जातो - इंग्लिश, सॉफ्टस्किल, कॉम्प्युटर अवेअरनेस, ॲनॉटॉमी, फिजिओलॉजी, न्युट्रिशिअन, बायोकेमिस्ट्री, नर्सिंग फाउंडेशन, मायक्रोबायोलॉजी

जी एन एम (GNM)साठी पुढील विषय आहेत

प्रथम वर्ष - बायोसायन्स, बिहेविअर सायन्स, नर्सिंग फाउंडेशन, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, इंग्रजी, कॉम्प्युटर अवेअरनेस

द्वितीय वर्ष - मेडिकल सर्जिकल १ आणि २, मेंटल हेल्थ नर्सिंग, चाइल्ड हेल्थ नर्सिंग

तृतीय वर्ष - गायनॉलॉजिकल नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग १ आणि २ नर्सिंग करिअर करण्यापूर्वी युवक-युवतींनी या क्षेत्राशी संबंधित सॉफ्ट आणि हार्ड स्किल आत्मसात कराव्यात. सॉफ्ट स्किलमध्ये तणावाचे व्यवस्थापन, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता, संयम तर हार्ड स्किलमध्ये व्हेंटिलेटर केअर, मेडिकल केअर, आयव्ही लाइन, क्लिनिकल डॉक्युमेंटेशन आदी आत्मसात केले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com