esakal | तिच्या जिद्दीला सलाम! शिक्षणासाठी सहा महिने राहिली चहा-बिस्कीटावर
sakal

बोलून बातमी शोधा

चारोलिया  अजीज

तिच्या जिद्दीला सलाम! शिक्षणासाठी सहा महिने राहिली चहा-बिस्कीटावर

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : उच्च शिक्षण घेण्याची प्रचंड इच्छा आणि जिद्द असल्यामुळे ती गुजरातहुन शिक्षणासाठी बेळगावला आली. मात्र याच काळात घरची आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे शुल्कही भरता येत नव्हते. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहील अशी भिती वाटत असताना शहरातील काही मुस्लीम समाजातील लोकांनी पुढाकार घेत तिच्या संपूर्ण शिक्षणाचा व बेळगावात राहण्याचा खर्च उचलला त्यामुळेच तीला आपली डॉक्टरी पूर्ण करता आली. त्यामुळेच तिने गुजरातला परत जाताना तिने बेळगावकरांचे आभार मानले आहेत.

गुजरात राज्यातील भावनगर येथील रहिवासी असणाऱ्या चारोलिया मूहजमा अब्दुल अजीज या विद्यार्थिनीने बेळगावातील रुरल आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालयात 2014 मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी चारोलिया हिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली होती त्यामुळे सुरुवातीला तिला काहीही त्रास झाला नाही. मात्र काही दिवसांनी तिला आर्थिक त्रास सहन करावा लागला. तसेच शुल्क भरण्यासाठी आणि इतर खर्चासाठीही पैसे मिळत उपलब्ध होत नव्हते. मात्र चारोलिया हिने हार न मानता शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला तसेच शिक्षणात खंड पडू नये यासाठी ही सहा महिने फक्त बिस्किट व चहा पिऊन राहत होती. तसेच दिवसाला फक्त वीस रुपये खर्च करत होती अशा परिस्थितीत शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिचे सुरू असलेले प्रयत्न पाहून मुस्लिम समाजातील काही जणांनी पुढाकार घेतला आणि 2015 पासून ते आत्तापर्यंत तिच्या सर्व शिक्षणाचा राहण्याचा खर्च सांभाळला.

हेही वाचा: पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर ; 21 बंधारे पाण्याखाली

अब्दुल कादिर हंचीनमनी, फैजुल्ला माडीवाले, अफजल टिनवाले, साजिद सय्यद यांच्यासह अलईक्रा, अलफला, बागवान वेल्फेअर आदींची मदत मिळाली. अंतिम परिक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन पुन्हा आपल्या गावी रवाना होण्यापूर्वी तिला शिक्षणासाठी यांनी मदत केली. त्या सर्वांची तिने भेट घेऊन आभार मानले. बेळगावात शिक्षण घेण्याचा अनुभव अतिशय चांगला असून येथील लोक खूप मनमिळावू आणि एकमेकांना मदत करणारे आहेत. त्यामुळेच या ठिकाणी घरची परिस्थिती हालाखीची असतानाही शिक्षण पूर्ण करता आले असे मत चारोलिया अजीज हिने व्यक्त केले.

शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक कामे करावी लागली. मात्र बेळगावातील अनेकांनी आपल्या मुलगी प्रमाणे शिक्षण घेण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. गावाकडे जाऊन दवाखाना सुरू केल्यानंतर गरजू आणि गरीब लोकांची मदत करणार आहे.

चारोलिया अजीज

loading image
go to top