जपानी कंपन्यांसाठी रेझ्युम कसा लिहावा  वाचा सविस्तर...

सुजाता कोळेकर
Thursday, 25 June 2020

नोकरी मिळविण्यासाठी चांगला रेझ्युम कसा लिहावा. रेझ्युमला नाव देताना तुमचे स्वतःचे नाव आणि तारीख नक्की असावी. जपानी कंपनीसाठी रेझ्युम लिहिण्यासाठी टेम्प्लेटस् मिळतात, त्यामध्येच रेझ्युम लिहावा.

रेझ्युम हा आपण मुलाखतीसाठी जाण्याआधी आपल्याबद्दलची माहिती मुलाखत घेणाऱ्याला देत असतो. नोकरी मिळविण्यासाठी चांगला रेझ्युम कसा लिहावा, हे महत्त्वाचे आहे. रेझ्युमला नाव देताना तुमचे स्वतःचे नाव आणि तारीख नक्की असावी. जपानी कंपनीसाठी रेझ्युम लिहिण्यासाठी टेम्प्लेटस् मिळतात, त्यामध्येच रेझ्युम लिहावा. 

तारीख ः रेझ्युम तयार केला आहे ती तारीख महत्त्वाची आहे. सगळी माहिती त्या तारखेपर्यंतची असावी. 

नाव ः फुरिगानामध्ये (जपानी लिपी) नाव लिहावे. त्यानंतर इंग्लिशमध्ये लिहावे. आधी आडनाव आणि नंतर स्वतःचे नाव लिहावे. 

राष्ट्रीयत्व ः त्यानंतर राष्ट्रीयत्व लिहावे. 

जन्मतारीख ः वर्ष (Year), महिना (Month), दिवस (Day). अशा पद्धतीनेच लिहावी. त्यापुढे मेल/फिमेल लिहावे. 

पत्ता ः त्यानंतर सध्याचा पत्ता, फोन नंबर आणि ई-मेल लिहावा. 

फोटो - शक्यतो नवीन फोटो लावावा. 

शैक्षणिक माहिती ः शैक्षणिक माहिती लिहिताना मुख्य पदवीबद्दल आणि जपानी भाषेच्या प्रमाणपत्राबद्दल लिहावे (अगदी दहावीपासून सगळे शिक्षण लिहिण्याची गरज नसते.) कामाचा इतिहास ः 

१. कंपनी रुजू केल्याचे वर्ष आणि महिना 
२. कंपनीचे आणि डिपार्टमेंटचे नाव 
३. पदाचे नाव 
४. कंपनी सोडल्याचे वर्ष आणि महिना 
वरील माहिती टेबल फॉरमॅटमध्ये असावी. 

त्यानंतर तुमचे स्पेशल क्वॉलिफिकेशन लिहावे, हे तुमचे स्वतःचे महत्त्वाचे मुद्दे असावेत. 
ज्या कंपनीसाठी अर्ज केला आहे त्या कंपनीबद्दल माहिती मिळवावी आणि आपल्याला काय माहिती आहे ते १-२ ओळींमध्ये लिहावे. प्रत्येक कंपनीसाठी वेगळा रेझ्युम तयार करावा. 

तुम्हाला त्या कंपनीमध्ये का नोकरी मिळावी आणि त्याचा कंपनीला आणि तुमच्या ध्येयाला कसा फायदा होईल ते थोडक्यात लिहावे. ही सगळी माहिती १-२ पानांमध्ये असावी. 

भारतातील शिक्षणाची बाजारपेठ (आकडे अब्ज डॉलरमध्ये) 
२०१६ - १०० 
२०२०- १८० 

१. शालेय शिक्षण - ५२ टक्के 
२. पुस्तके व ई-लर्निंग - २८ टक्के 
३. उच्च शिक्षण - १५ टक्के 
४. व्होकेशनल, उत्पादने व सेवा - ५ टक्के 

काही कंपन्या एक्सेलमध्येच रेझ्युम मागतात, कारण त्यांना डेटा प्रोसेस करायचा असतो. कंपनीला कुठल्या फॉरमॅटमध्ये रेझ्युम हवाय ते माहिती करून घ्या. 
मुलाखतीसाठी जाताना आपला कंपनीला काय उपयोग होणार आहे त्याची योग्य माहिती तयार करावी. आपली माहिती देताना रेझ्युममध्ये आहे तीच माहिती पुन्हा पुन्हा सांगू नये. 

पेहराव - मुलाखतीसाठी जाताना योग्य कपडे असावेत, ती ऑनलाइन असो किंवा वैयक्तिक. जपानमध्ये सगळेच नोकरी करणारे लोक सूट वापरतात, त्यामुळे जपानी कंपनीमध्ये मुलाखत देताना सूट घालवा. जपानी कंपनीसाठी लागणाऱ्या रेझ्युमचा फॉरमॅट समजून घेतला तर हे काम अगदी सोप्पे आहे. 

सुजाता कोळेकर, सीनियर डायरेक्टर कॅपजेमिनी टेक्नॉलॉजिज सर्व्हिसेस इंडिया 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sujata kolekar article about how to write a resume for Japanese companies

Tags
टॉपिकस
Topic Tags: