जपानच्या चित्रपट उद्योगातील संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajnikant

जपान संस्कृतिप्रधान देश असल्यामुळे तिथे अगदी उच्च दर्जाचे चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. अकिरा कुरोसावा यांचा ‘सेव्हन सामुराई’ हा चित्रपट ४३ देशांमध्ये गाजला होता. जपानने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेच्या चित्रपटासाठी ‘अकादमी’ पुरस्कार चार वेळा मिळविला आहे. 

जपानच्या चित्रपट उद्योगातील संधी

sakal_logo
By
सुजाता कोळेकर, जपान

जपानचा चित्रपट उद्योग हा खूप जुना व्यवसाय आहे. जागतिक पातळीवर विचार केल्यास हा चौथ्या क्रमांकाचा उद्योग आहे. जपानने २०११मध्ये ४११ चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर २.३३ अब्ज डॉलरची कमाई केली. जपान संस्कृतिप्रधान देश असल्यामुळे तिथे अगदी उच्च दर्जाचे चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. अकिरा कुरोसावा यांचा ‘सेव्हन सामुराई’ हा चित्रपट ४३ देशांमध्ये गाजला होता. जपानने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेच्या चित्रपटासाठी ‘अकादमी’ पुरस्कार चार वेळा मिळविला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मी २००३मध्ये चेन्नईमध्ये असताना मला अनेक जण तमीळ भाषा येते का, असे विचारत. त्याचे कारण अनेक तमीळ चित्रपटांचे जपानी भाषेमध्ये डबिंग होते आणि हे चित्रपट जपानमध्ये अनेक जपानी पाहतात. रजनीकांतचा ‘डान्सिंग महाराजा’ हा चित्रपट जपानमध्ये ‘ओडोरी महाराजा’ नावाने प्रदर्शित झाला आणि गाजला. रजनीकांतचे जपानमध्ये अनेक चाहते आहेत. त्यांचा फोटो असणारे शर्ट्‌सही तेथे प्रसिद्ध होते.

भारतीय चित्रपटांचे भाषांतर करणे हा तेथे एक मोठा व्यवसाय आहे. अनेक भारतीय चित्रपट हे जपानमध्ये शैक्षणिक कारणांसाठीही दाखविले जातात. चित्रपटसृष्टीमध्ये या क्षेत्रात करिअर करायची इच्छा असणाऱ्यांसाठी हा एक खूप चांगला व्यवसाय आहे. यासाठी साधारण जपानी भाषा लेव्हल दोनपर्यंत यायला हवी, जपानी संस्कृतीचा अभ्यास करायला हवा. या कामामध्ये दोन प्रमुख भाग असतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

१. चित्रपटाचे भाषांतर 
२. चित्रपटाचे डबिंग 

भाषांतर करण्यासाठी अगदी प्रत्येक शब्दासाठी मानधन दिले जाते. डबिंगमध्ये संवादानुसार पैसे मिळतात. महाराष्ट्रीय लोकांचे जपानी भाषेचे उच्चार चांगले असल्यामुळे त्यांना अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात. अशा प्रकारच्या करिअरचा आपण विचार करत नाही. पण, अगदी घरी बसूनही दोन्ही कामे होऊ शकतात.

कला शाखेतील पदवीधारक असलेल्या व जपानी भाषेचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. अगदी दोनच महिन्यांपूर्वी एका वकिलाने एक शैक्षणिक चित्रपट जपानी भाषेत भाषांतर करून घेण्याविषयी चौकशी केली होती. एका चित्रपटामध्ये कमीत कमी १० हजार दृश्ये असतात आणि एका दृश्यामध्ये ५०-२०० शब्द असतात; म्हणजेच एका चित्रपटाचे भाषांतर हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. चित्रपटाची आवड असणाऱ्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल. या क्षेत्राचा करिअरच्या दृष्टीने नक्की विचार करावा.

loading image
go to top