
NEET PG 2022 : परीक्षा नियोजित वेळेतच होणार, SC ने फेटाळली याचिका
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून NEET PG 2022 ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. ही परीक्षा पुढे ढकला अशी मागणी करणारी याचिका देखील सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court on NEET PG 2022 Exam) दाखल करण्यात आली होती. पण, न्यायालयाने आज ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे परीक्षा ठरलेल्या वेळवेनुसारच होणार आहे.
हेही वाचा: NEET अवघ्या काही दिवसांवर; जाणून घ्या अभ्यासाच्या काही टिप्स!
NEET PG 2021 समुपदेशनात उशीर झाला होता. आता देखील परीक्षेचा दिवस आणि समुपदेशन यामध्ये कमी अंतर असल्यामुळे विद्यार्थी परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याची विनंती करत आहेत. पण, आता सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार २१ मे रोजी होणार आहे.
विद्यार्थ्यांचं म्हणणं काय? -
NEET परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, परीक्षा आणि समुपदेशन यातील कालावधी फारच कमी आहे. आम्ही समुपदेशनाला उपस्थित राहावे की, परीक्षेची तयारी करावी या संभ्रमात आहोत. तसेच या वर्षी एमसीसीने समुपदेशनाचे वेळापत्रक जवळपास ७ वेळा बदलले आहे. अखिल भारतीय आणि राज्य स्तरावर मॉप अप फेरी देखील रद्द करण्यात आली. परीक्षा संस्थांनी निर्माण केलेल्या या अनिश्चिततेमध्ये अभ्यास कसा करायचा? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता.
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं? -
परीक्षा पुढे ढकलल्याने अराजकता आणि अनिश्चितता निर्माण होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. इतकेच नाही तर त्याचा रुग्णांच्या सेवेवरही परिणाम होईल आणि NEET PG ची तयारी करणाऱ्या २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय पक्षःपातीपणाचा होईल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
Web Title: Supreme Court Rejects Plea Seeking To Postpone Neet Pg 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..