esakal | NEET अ‍ॅन्सर की अन्‌ परीक्षा निकालाच्या या आहेत संभाव्य तारखा!
sakal

बोलून बातमी शोधा

NEET ची अ‍ॅन्सर की अन्‌ परीक्षा निकालाच्या या आहेत संभाव्य तारखा!

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (यूजी) - 2021 रविवार, 12 सप्टेंबर 2021 रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात आली.

NEET ची अ‍ॅन्सर की अन्‌ परीक्षा निकालाच्या या आहेत संभाव्य तारखा!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (National Eligibility cum Entrance Test) (UG) - 2021 रविवार, 12 सप्टेंबर 2021 रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) द्वारे घेण्यात आली. 2021-22 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या (Medical courses) (एमबीबीए, बीडीएस) प्रवेशासाठी उमेदवारांच्या निवडीकरिता घेण्यात आलेल्या देश आणि परदेशातील परीक्षा केंद्रांवर अंदाजे 16 लाख उमेदवार नीट यूजी 2021 मध्ये उपस्थित होते. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवार NEET UG 2021 अ‍ॅन्सर की आणि NEET UG 2021 चा निकाल घोषित होण्याची वाट पाहात आहेत. NTA NEET परीक्षा ऍन्सर की आणि निकाल कधी जाहीर करू शकतो हे जाणून घ्या.

हेही वाचा: डीटीई महाराष्ट्रने जाहीर केली एसएससी डिप्लोमाची अंतिम गुणवत्ता यादी!

NEET UG 2021 'अ‍ॅन्सर की'ची तात्पुरती तारीख

जर आपण मागील वर्षांचा नमुना पाहिला तर, 2019 मध्ये NEET ची अ‍ॅन्सर की NTA ने 24 व्या दिवशी म्हणजेच 5 मे रोजी झालेल्या परीक्षानंतर 29 मे रोजी जारी केली. त्याचवेळी 2020 मध्ये 13 सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली आणि 26 सप्टेंबर रोजी म्हणजे 14 व्या दिवशी अ‍ॅन्सर की जारी करण्यात आली. या क्रमाने पाहिल्यास, या वर्षीच्या NEET UG 2021 परीक्षेची अ‍ॅन्सर की 25 सप्टेंबर 2021 पर्यंत जारी होण्याची शक्‍यता आहे. तथापि, एनटीएने अधिकृत तारीख निश्‍चितपणे जाहीर केलेली नाही.

हेही वाचा: 'ECIL'मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 16 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

NEET UG 2021 निकालाची तात्पुरती तारीख

त्याचप्रमाणे, जर निकालाबाबत बोलायचे झाल्यास NEET 2019 चे निकाल एका महिन्यानंतर 4 जून रोजी आणि 2020 मध्ये देखील 16 ऑक्‍टोबर रोजी एका महिन्यात घोषित करण्यात आले. याच क्रमाने यावर्षी देखील NEET UG 2021 परीक्षेचा निकाल एका महिन्यात म्हणजेच 10 ऑक्‍टोबर 2021 पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. NTA ने निकाल घोषित करण्याची नेमकी तारीख जाहीर केली नसल्याने उमेदवारांनी वेळोवेळी NEET UG परीक्षा पोर्टल neet.nta.nic.in ला भेट देत राहावे.

loading image
go to top