Air India: पगाराच्या वादात एअर इंडिया करणार 1,000 वैमानिकांची भरती; काय आहे कारण?

एअर इंडियाने नवीन भरतीबाबत माहिती दिली आहे.
Ratan Tata
Ratan TataSakal

Air India: टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये नोकरीची संधी आहे. टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया 1,000 पदांसाठी नोकर भरती करणार आहे. आपले नेटवर्क वाढवण्यासाठी, कंपनी पायलट आणि प्रशिक्षकांच्या पदासाठी सुमारे 1 हजार लोकांची भरती करेल.

अलीकडेच, कंपनीने मुलाखतीद्वारे 495 पदांसाठी नोकर भरती केली होती. मात्र आता कंपनी 1 हजार लोकांची भरती करणार आहे. यामध्ये वरिष्ठ पायलटपासून ते प्रशिक्षणार्थी पायलटपर्यंतचा समावेश आहे. एअर इंडियाकडे सध्या 1800 पेक्षा जास्त पायलट आहेत.

टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये सध्या 1800 पेक्षा जास्त पायलट आहेत. यासोबतच एअर इंडियाने बोईंग आणि एअरबसकडून 470 जेटची ऑर्डर दिली आहे.

गुरुवारी एअर इंडियाने नवीन भरतीबाबत माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले की 1000 हून अधिक पदांची भरती करण्याची योजना आहे. यामध्ये पायलट, प्रथम अधिकारी आणि प्रशिक्षक यांचा समावेश आहे.

Ratan Tata
Adani Group: गौतम अदानी नवीन प्रोजेक्टसाठी घेणार 65,41,37,20,800 रुपयांचे कर्ज; 'या' बँका करणार मदत

ही नवीन नियुक्ती A320, B777, B787 आणि B737 विमानांसाठी केली जात आहे. यासोबतच कंपनी आपल्या नेटवर्कमध्ये आणखी 500 विमानांचा समावेश करणार आहे.

पगार रचना बदलल्याने कर्मचारी संतप्त:

अलीकडेच 17 एप्रिल रोजी एअर इंडियाने आपल्या पगाराच्या रचनेत बदल केला आहे. यामुळे हजारो कर्मचारी संतप्त झाले असून पायलट युनियन आणि इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन या दोघांनीही याला विरोध केला आहे.

या दरम्यान, कंपनीने नवीन भरती जाहीर केली आहे. पगाराच्या रचनेत बदल करण्यापूर्वी विमान कंपनीने त्यांच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही, असे पायलट युनियनचे म्हणणे आहे.

टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारी 2022 मध्ये एअर इंडिया विकत घेतली होती. त्यानंतर कंपनी एकापाठोपाठ एक बदल करत आहे. सध्या कंपनीने 470 विमानांची ऑर्डर दिली आहे.

Ratan Tata
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com