D Pharmacy : औषधनिर्माणच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा; द्वितीय वर्षाला मिळणार प्रवेश

औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा २०२३ मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
D. Pharmacy Admission
D. Pharmacy Admissionesakal

पुणे - वर्षभराचा अभ्यासक्रम ९० दिवसांत पूर्ण करत औषधनिर्माणशास्त्र पदविकेची (डी. फार्मसी) वार्षिक परीक्षा घेण्यात आली. अपूर्ण वेळ आणि आवाक्याबाहेरील अभ्यासक्रमामुळे प्रथम वर्षाचे ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी नापास झाले होते. एक प्रकारे विद्यार्थ्यांवर झालेला हा अन्याय दूर करण्यासाठी राज्य तंत्र शिक्षण मंडळाने तात्पुरता दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा घ्यावी म्हणून सकाळनेही वृत्त प्रसिद्ध केले होते.

औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा २०२३ मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षात तात्पुरता प्रवेश दिला जाणार असून, त्यांना हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच दुसऱ्या वर्षाची परीक्षा देता येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाल्याच्या कारणास्तव विद्यार्थी हितासाठी हा निर्णय घेतल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

एक वेळ संधी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये द्वितीय वर्षाचे सत्र पूर्ण करून घेण्यासाठीच आहे. प्रथम वर्षातील ज्या विद्यार्थ्यांनी २०२२-२३ सत्र पूर्ण केले आहे, त्यांनाच दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात येऊन सत्र पूर्ण करून घेण्याची संधी मिळणार आहे.

मंडळाच्या सूचना -

- हिवाळी परीक्षेत प्रथम वर्षाचे जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील तेच दुसऱ्या वर्षात प्रवेशास पात्र ठरतील

- विद्यार्थी उन्हाळी परीक्षा २०२४ पासून द्वितीय वर्षाची परीक्षा देण्यास पात्र ठरतील.

- प्रथम वर्षाच्या अंतिम परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी ही संधी मिळणार नाही.

- एक वेळी संधीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी संस्थेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध केली जाईल.

- संधी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेने मंडळाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी करणे बंधनकारक राहील.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अध्यापन वर्ग -

एक वेळ संधीमुळे एका विशिष्ट वर्गात विद्यार्थी संख्या जास्त झाल्यास नियमित तसेच ही संधी प्राप्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्थेने वेगळा वर्ग तयार करून सैक्षणिक कामकाज पूर्ण करावे, अशा सुचना मंडळाने संस्थांना दिल्या आहेत.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुत्तीर्ण विषयांचे आकलन योग्यप्रकारे होण्यासाठी विषयनिहाय अध्यापन वर्ग घ्यावे लागणार आहेत. शनिवार, रविवार किंवा नियमित वेळापत्रकाव्यतिरिक्त दररोज एक किंवा दोन जादा तासिका घेण्यास सांगण्यात आले आहे.

औषधनिर्माणशास्त्राच्या पदविका अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असून, स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. सकाळनेही यासंदर्भात वृत्त दिले होते.

- डॉ. व्ही.एन.जगताप, प्राचार्य, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आझम कॅंपस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com